लोकमान्य विद्यालयात कोरोना योध्दांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:03+5:302021-08-21T04:33:03+5:30

भद्रावती : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील लोकमान्य विद्यालयातर्फे शहरातील कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी लोकसेवा ...

Corona warriors felicitated at Lokmanya Vidyalaya | लोकमान्य विद्यालयात कोरोना योध्दांचा सत्कार

लोकमान्य विद्यालयात कोरोना योध्दांचा सत्कार

Next

भद्रावती : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथील लोकमान्य विद्यालयातर्फे शहरातील कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून लोकसेवा मंडळाचे सचिव मनोहर पारधे, सहसचिव नामदेव कोल्हे, लोकसेवा मंडळाचे सदस्य मधुकर नारळे, उमाकांत गुंडावार, गोपाल ठेंगणे, अविनाश पाम्पट्टीवार, आशिष गुंडावार, अमित गुंडावार, संजय पारधे, मुख्याध्यापक बंडू दरेकर आणि सत्कारमूर्ती कोरोना योद्धे व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकारी मिताली सेठी यांच्या संकल्पनेतील कुंडी वृक्षारोपण विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, डाॅ. विवेक शिंदे, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.अडगुडवार, वाहतूक शिपाई तनू टेकाम, रुग्णवाहिका चालक पंकज कातोरे, स्वर्गरथ चालक अजय खांदारे, नगरसेवक विनोद वानखेडे, कॅटरर्स व्यवसायी हनुमान घोटेकर आणि सफाई कामगार मारोती नान्हे यांचा कोरोना योद्धे म्हणून मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: Corona warriors felicitated at Lokmanya Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.