रुद्रा प्रतिष्ठानतर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:40+5:302021-07-04T04:19:40+5:30
जिवती : शहरात प्रथमच रुद्रा प्रतिष्ठान जिवती यांच्या वतीने कोरोना महामारीत विशेष कामगिरी करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. ...
जिवती : शहरात प्रथमच रुद्रा प्रतिष्ठान जिवती यांच्या वतीने कोरोना महामारीत विशेष कामगिरी करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती प्रा. महेश देवकते होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती अंजना पवार, गटविकास अधिकारी आस्कर, बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी रामदास अनकाडे, डॉ. अंकुश गोतावळे, मेहबूब शेख, भीमराव पवार उपस्थित होते.
चिमूर वनक्षेत्रात सेवा देत असताना आपल्या सहकार्यावर वाघाने केलेला हल्ला दिसताच आपला जीव धोक्यात टाकून वाघाला परतवून लावून सहकार्याचा जीव वाचवल्याबद्दल वनरक्षक परमेश्वर तांबुळगे आणि संभाजी बळदे यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल तसेच कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या काळात जिथे रुग्णाचे जवळचे नातेवाईक पाठ फिरवतात तिथे रुग्णाचे मनोबल वाढवून त्यांना आपली सेवा देणारे महेश देवकते, रुग्णसेवक जीवन तोगरे, सामाजिक कार्यकर्ते विजय गोतावळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील जाधव, सचिव मनोहर पानपट्टे, उपाध्यक्ष विलास वावरे, सहसचिव व्यंकटी तोगरे, कोषाध्यक्ष विलास कळसकर, नामदेव मुंडे, वाकूराम सोनर, दत्ता जाधव, कृपानंद गभने, अशोक मोरे, अंबादास वाघमारे उपस्थित होते.
030721\img-20210703-wa0145.jpg
कोरोना योध्यानचा सत्कार करताना मान्यवर