दारूबंदी हटवून मिळणाऱ्या महसुलातून कोरोना योद्धयांचे वेतन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:41+5:302021-05-20T04:29:41+5:30

कोरोनामुळे संपूर्ण देश गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनाचा संसर्ग संपविण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद ...

Corona warriors should be paid from the revenue generated by lifting the embargo | दारूबंदी हटवून मिळणाऱ्या महसुलातून कोरोना योद्धयांचे वेतन करावे

दारूबंदी हटवून मिळणाऱ्या महसुलातून कोरोना योद्धयांचे वेतन करावे

Next

कोरोनामुळे संपूर्ण देश गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. कोरोनाचा संसर्ग संपविण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. नागरिकांसोबत शासनाची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. यात कोरोना विषाणूला संपविण्यासाठी डॉक्टर, शास्त्रज्ञ यांच्यासह अनेक क्षेत्रातील कोरोना योद्धे रात्रंदिवस आपल्या जीवाची व कुटुंबाची परवा न करता कार्य करीत आहे. परंतु त्यांना या कामाचा मिळणारा मोबदला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडत असून त्याचा त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हीच स्थिती आहे. याठिकाणी गेल्या सहा वर्षांपासून दारूबंदी आहे. त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही दारूबंदी फसली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात दारू सुरु आहे. त्याच धरतीवर जिल्ह्यातील दारूबंदी हटवावी आणि त्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून जिल्ह्यातील कोरोना योद्धयांचे वेतन करावे. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन राजू गैणवार यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, राज्य उत्पादन शुल्कमंत्री, पालकमंत्री यांना दिले आहे.

Web Title: Corona warriors should be paid from the revenue generated by lifting the embargo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.