कोरोनापुढे डेंग्यू, मलेरियाच्या साथींनीही फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:19 AM2021-06-10T04:19:42+5:302021-06-10T04:19:42+5:30
उन्हाळाच्या अखेरच्या टप्प्यातच वातावरण बदलामुळे आणि पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. दरवर्षी आरोग्य विभागाला साथ आटोक्यात ...
उन्हाळाच्या अखेरच्या टप्प्यातच वातावरण बदलामुळे आणि पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. दरवर्षी आरोग्य विभागाला साथ आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत होते. मात्र, मागच्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, कोरोनाच्या साथीपुढे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने उद्भवणारे साथीचे आजार मात्र यंदा गायब झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा हिवताप विभागातर्फे साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाभरात नागरिकांच्या तपासण्या केल्या. मात्र, त्यातील बोटावर मोजण्याइतकेच नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या साथीपुढे पारंपरिक साथीच्या आजारानेही हात टेकल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. मात्र, तरीसुद्धा नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत काळजी घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
ही घ्या काळजी
१) घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा. कुलरची टाकी स्वच्छ करावी. कुठेही पाणी साचू देऊ नये.
२) टायर, फुटके मडके, भंगार साहित्यामध्ये पाणी साचू देऊ नये.
३) आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा पाडावा. ताप आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.
-------
साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात आली आहे. सीएचओ, एमपीडब्ल्यूमार्फत प्रत्येक आठवड्याला सर्वेक्षण केले जात असून, गावागावांत जनजागृती केली जात आहे.
प्रतीक बोरकर, हिवताप अधिकारी, चंद्रपूर
बॉक्स
डबक्यांमध्ये गप्पी मासे
डास उत्पत्ती नियंत्रणासाठी गप्पी माशांची उपयुक्तता, परिसर स्वच्छता, व्यक्तिगत सुरक्षाअंतर्गत मच्छरदाणीचा वापर, डासांच्या चाव्यापासून रक्षणासाठी विविध उपाय करणे आवश्यक आहे.
२) आरोग्य विभागातर्फे साथरोग नियंत्रणासाठी गप्पी मासे पाळा, अशी मोहीम दरवर्षी राबविण्यात येत असते. त्यामुळे साथरोग टाळण्यास मदत होत असते.