कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पोहोचले ९७ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:20 AM2021-06-18T04:20:35+5:302021-06-18T04:20:35+5:30

२४ तासात जिल्ह्यात ५२ जणांनी कोरोनावर मात केली तर, केवळ ४४ पॉझिटिव्ह आढळले. बाधितांची संख्या ८४ हजार ४०८ ...

The coronal release rate reached 97 percent | कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पोहोचले ९७ टक्क्यांवर

कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पोहोचले ९७ टक्क्यांवर

Next

२४ तासात जिल्ह्यात ५२ जणांनी कोरोनावर मात केली तर, केवळ ४४ पॉझिटिव्ह आढळले. बाधितांची संख्या ८४ हजार ४०८ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८२ हजार ११२ झाली आहे. सध्या ७८५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ५ लाख २८ हजार ६४ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी ४ लाख ४० हजार ९८८ नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत १५११ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील रुग्ण घटले

जिल्ह्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. बाधित आढळलेल्या ४४ रुग्णांमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील १२, चंद्रपूर तालुका ४, बल्लारपूर १, भद्रावती ८, ब्रह्मपुरी ०, नागभीड ०, सिंदेवाही १, मूल ३, सावली १, पोंभुर्णा १, गोंडपिपरी २, राजुरा २, चिमूर १, वरोरा ३, कोरपना ३, जिवती १ व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तुलना

पहिल्या लाटेत पॉझिटिव्हचे प्रमाण (पिरियड ॲन्ड केसेस परमिलियन) १०३९८/४५६१ होती. दुसऱ्या लाटेत ६००९९/२४७२२ झाली. दररोज सर्वाधिक ४३९ रुग्ण आढळत होते, ते दुसऱ्या लाटेत १७२८ झाले. अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये दररोज ४४४८ होते ते १६८८२ झाले. दररोजचा जास्तीत पॉझिटिव्ह रेट ४८. ७३ होता तो ६६.७१ झाला. दररोजच्या अधिकाधिक चाचण्याही परमिलियन २४३३/१०६७ अशा होत्या. त्यामध्ये ५०५०/२२१४ असे प्रमाण झाले. मृतांच्या संख्येत ११/४८२ असे प्रमाण (डे ॲन्ड डेथ परमिलियन) होते. त्यात आता ३९/३९२० असा बदल झाला आहे.

बेड्स आणि ऑक्सिजन पुरवठ्यात झालेला बदल

पहिल्या लाटेत सीएसआरची स्थिती १.०१ होती ती दुसऱ्या लाटेत १.७९ झाली. सीसीसी बेड्स २३/२१०० तर दुसऱ्या लाटेत ३७/३१३७ झाली. डीसीएचसी बेड्समध्ये १२/३९४ दुसऱ्यात ३४/१०४०, डीसीएच बेड्समध्ये ५/२८५ व दुसऱ्यात ११/९२९ एवढे झाले. ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती पहिल्या लाटेत ६.४ मेट्रिक टन होती, दुसऱ्या लाटेत ३० मेट्रिक टन झाली.

रुग्णवाहिकेचा चंद्रपूर पॅटर्न राज्यभरात

कोरोना संसर्गाचा भयानक उद्रेक झाला असताना रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले होते. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने यासाठी विशेष यंत्रणा तयार केली. दर निश्चित करून त्याबाबतचे स्टिकर रुग्णवाहिकेला चिकटविणे बंधनकारक केले. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबांची आर्थिक पिळवणूक दूर झाली. हा चंद्रपूर पॅटर्न राज्याच्या परिवहन आयुक्तांनी राज्यभरात लागू केला.

अशी तुटली कोरोना संसर्ग साखळी

दुसऱ्या लाटेत तालुका कंट्रोल रूम तयार झाले. जिल्हा कंट्रोल रूमद्वारे संनियंत्रण करून जागृतीची व्याप्ती वाढविली. जिल्हा प्रशासनाने गंभीर रुग्णांसाठी कोविड पेशंट पोर्टल तयार केले. खासगी रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहित केली. ऑक्सिजनचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट झाले. आयसोलेशन तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी मिळाला. सीसीसी, डीसीएचसीचा विस्तार, व्यवस्थापन, संनियंत्रण व वेळोवेळी घातलेले निर्बंध कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Web Title: The coronal release rate reached 97 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.