रिक्षाचालकांना कोरोनाचा आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:21+5:302021-06-03T04:20:21+5:30
चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटाने सर्वत्र दहशत माजवली आहे. यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी लहान व्यावसायिकांसह छोटे-मोठे ...
चंद्रपूर : मागील वर्षीपासून कोरोना संकटाने सर्वत्र दहशत माजवली आहे. यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आले. परिणामी लहान व्यावसायिकांसह छोटे-मोठे काम करणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. यामध्ये रिक्षाचालकांचेही मोठे नुकसान होत असून जगण्याचा मोठा प्रश्न त्यांना पडला आह.
कोरोनामुळे प्रत्येकाचे नुकसान होत आहे. मात्रए ज्यांचे हातावर पोट आहे, रोजमजुरी करतात त्यांचे हाल सुरू आहेत. मागील वर्षी हे हाल कसेबसे सोसले. मात्र यावर्षीही लाॅकडाऊन झाल्यामुळे आता त्यांचाही संयम सुटला आहे. मात्र, इलाजच नसल्यामुळे काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना रिकामे रहावे लागत आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
शहरात जवळपास चारशे ते पाचशे हातरिक्षाचालक आहेत. ते विविध साहित्य पोहोचवून मिळालेल्या भाड्यामध्ये गाडीचे भाडे देऊन संसार चालवालचे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कामच नाही. नाही म्हणायला एखाद्याला किराणा सामान नेण्याचे काम मिळत आहे. मात्र, नियमित काम नसल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
शहरातील विविध चौकांमध्ये ते उभे राहून भाडे मिळाल्यानंतर जात होते. मात्र, आता कामच मिळत नाही. मागील वर्ष कसेतरी काढले. मात्र यावर्षीही तीच अवस्था असल्यामुळे आता तर अनेकांनी हात टेकले आहेत.
बॉक्स
दुरुस्ती खर्चही निघत नाही
काम मिळत नाही. मात्र, एकाच जागेवर रिक्षा ठेवून असल्यामुळे खराब होत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठीही पैसा लागतो. मात्र, तो पैसाही सध्या अनेकांजवळ नाही. त्यामुळे बाजारपेठ सुरू झाली तरी रिक्षाच्या दुरुस्ती कामामुळे आणखी वाटच बघावी लागणार आहे.
बाॅक्स
शासनाने मदत करावी
लाॅकडाऊन सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाने विविध कामगार, मजुरांना विविध योजना जाहीर करून अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. मात्र, हातगाडी, रिक्षाचालकांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
बाॅक्स
कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यातच आता वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे छोटे-मोठे साहित्य या वाहनांवरच नागरिक घेऊन जातात. मागील अनेक वर्षांपासून हातगाडी चालविण्याचे काम करतो. परंतु असे संकट आले नाही. चार पैसे मिळत होते. मात्र, आता काहीच मिळत नसल्याची खंत येथील रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.