चंद्रपुरात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:25 AM2021-02-07T04:25:54+5:302021-02-07T04:25:54+5:30
देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. ...
देशात कोरोना विषाणूचा पसार होताच सुमारे दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात २ मे रोजी पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात हळूहळू रुग्णसंख्या वाढू लागली. प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. मात्र तरीसुद्धा ५ सप्टेंबरपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात २३ हजार ११८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यापैकी २२ हजार ६२५ जण कोरोनातून मूक्त झाले. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला मूत्यू १ ऑगस्ट रोजी झाला. त्यानंतर मृतकाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यात चक्क १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ५ फेब्रुवारीपर्यंत ३९१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. प्रशासनाच्या प्रयत्नाने आता कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असून मृतकांची संख्याही नाहीच्या बरोबरीत आहे. परंतु, नागरिकांना स्वत:ची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात येत आहे.
बॉक्स
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २ मे रोजी आढळून आला. तर १ ऑगस्ट रोजी पहिला कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर या संख्येत झपाट्याने वाढ झाली. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात १२३ रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंर ऑक्टोबर ७८, नोव्हेंबर ७०, डिसेंबर ६४ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
कोट
कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी विना मॉस्क जाणे टाळावे, बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे. स्वत:च स्वत:चे रक्षक बनून काळजी घ्यावी, तेव्हाच आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकतो.
- डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर