कोरोनाचा पाश सैल होतोय बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:00 AM2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:22+5:30
जिल्ह्यात गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ५९, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर-दोन, मूल-१४, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-एक, ब्रह्मपुरी-चार, नागभीड-नऊ, वरोरा-११, भद्रावती-१४, सावली-११, सिंदेवाही-१२, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली दोन तर यवतमाळ येथील एक असे एकूण १५१ बाधित पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून बाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. गुरुवारी १५१ नवीन बाधितांची भर पडली असून २७० बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. आता बाधितांची एकूण संख्या ११ हजार ६२३ वर गेली आहे. तर आतापर्यंत आठ हजार ३६९ बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या तीन हजार ७४ बाधितांवर उपचार सुरू आहे.
जिल्ह्यात गुरुवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील ५९, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर-दोन, मूल-१४, गोंडपिपरी-पाच, जिवती-एक, कोरपना-एक, ब्रह्मपुरी-चार, नागभीड-नऊ, वरोरा-११, भद्रावती-१४, सावली-११, सिंदेवाही-१२, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली दोन तर यवतमाळ येथील एक असे एकूण १५१ बाधित पुढे आले आहे.
मृत्यूसंख्याही घटली, केवळ एकाचा मृत्यू
जिल्ह्यात बाधितांसह आता मृत्यूसंख्याही घटत असताना दिसत आहे. गुरुवारी जिल्ह्यात केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितामध्ये, इंदिरा नगर, चंद्रपूर येथील ५३ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ४ आॅक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधिताला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार होता. जिल्ह्यात आतापर्यंत १८० बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १७१ रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील बाधित
बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्ड, विद्या नगर वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विरुर भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील बावणे लेआउट परिसर, आनंदवन, आंबेडकर वार्ड, विनायक लेआउट परिसर, सुभाष वार्ड, चिनोरा, जिजामाता वार्ड, माढेळी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधिनगर, मेढंकी, पिंपळगाव भोसले परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील बाजार वार्ड, पिपरबोरी, झिगुंजी वार्ड, गौतम नगर झाडे प्लॉट परिसर, श्रीराम नगर भागातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव, वार्ड नंबर ८, कापसी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, रत्नापूर, काचेपार भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवखळा, किटाळी, आकापुर, पार्डी, परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड, ठक्कर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील चिरोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
चंद्रपुरातील बाधितही कमी होतेय
चंद्रपूर शहरातील व परिसरातील बाधितांची संख्याही आता कमी होत आहे. चंद्रपुरात शंभराच्या आतच बाधित आढळून येत आहे. गुरुवारी ५९ नवे बाधित आढळले. यात भिवापूर वार्ड, विवेकानंदनगर वडगाव, दादमहल वार्ड, गंज वार्ड, रयतवारी कॉलनी परिसर, दुगार्पुर, नगीना बाग,घुटकाळा वार्ड, तुकुम, अंचलेश्वर वार्ड, बाबुपेठ, दत्तनगर, सावरकर नगर, घुगुस, हनुमान मंदिर परिसर, सिस्टर कॉलनी, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.