कोरोनामुक्तीचा आलेख चार दिवसांपासून चढतीवरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:29 AM2021-05-09T04:29:29+5:302021-05-09T04:29:29+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७० हजार ५८४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ५४ हजार ४४८ ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ७० हजार ५८४ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ५४ हजार ४४८ झाली आहे. सध्या १५ हजार १० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ८ हजार ६२३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ३३ हजार ४७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १०८० बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ९९६, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३१, यवतमाळ ३७, भंडारा १०, वर्धा एक, गोंदिया एक आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
असे आहेत मृत
कोरोनामुळे मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील ३५, ५३, ५८,६९ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महिला, कोतवाली वाॅर्ड येथील ३४ वर्षीय पुरुष, तुकूम येथील ५८ वर्षीय पुरुष, कृष्णा नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील ४२, ५७, ८० वर्षीय पुरूष, ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील ८० वर्षीय पुरूष, ५३ वर्षीय पुरूष, बल्लारपूर तालुक्यातील १८ व ३५ वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील ६० वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील धरमपूर येथील ५० वर्षीय पुरुष, भंगाराम तळोधी येथील ५५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, आरमोरी गडचिरोली येथील ७० वर्षीय महिला आणि गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अजुर्नी येथील ६८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कोट
नागरिकांनी स्वत: व कुटुंबाची काळजी घ्यावी
नागरिकांनी खबरदारी घेतल्यास कोरोना संसर्गाला टाळता येऊ शकते. त्यामुळे विनाकारण घराबाहेर जाऊ नये, मास्क वापर, वारंवार हात धुवावे, सुरक्षित राखावे. स्वत:ची काळजी घ्यावी व पात्र नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण
चंद्रपूर मनपा क्षेत्र ३७३
चंद्रपूर तालुका ९९
बल्लारपूर ७५
भद्रावती ९१
ब्रह्मपुरी ४९
नागभिड १९
सिंदेवाही ४६
मूल ५४
सावली ४६
पोंभूर्णा ०४
गोंडपिपरी ०९
राजूरा ७३
चिमूर ४७
वरोरा ८६
कोरपना ५७
जिवती १०
अन्य २२