Coronavirus positive story; ३४ दिवसांच्या दीर्घ उपचारानंतर युवकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 08:32 AM2021-05-26T08:32:26+5:302021-05-26T08:32:49+5:30

Chandrapur news राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक लांजेवार यांच्या रुग्णांनावरील वेगवेगळ्या उपचार पद्धतीने ते दवाखान्यातील देवदूतच असल्याची भावना रुग्णालयात मागील ३४ दिवसांपासून उपचार घेतल्यानंतर मंगळवारी सुटी होऊन सुखरूप घरी परतलेल्या गजानन भोपये या तरुण रुग्णासह अन्य रुग्णांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

Coronavirus positive story; Life saving for the youth after 34 days of long treatment | Coronavirus positive story; ३४ दिवसांच्या दीर्घ उपचारानंतर युवकाला जीवदान

Coronavirus positive story; ३४ दिवसांच्या दीर्घ उपचारानंतर युवकाला जीवदान

googlenewsNext
ठळक मुद्दे१३२ रुग्ण परतले मृत्यूच्या दाढेतून

नितीन मुसळे

चंद्रपूर : राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक लांजेवार यांच्या रुग्णांनावरील वेगवेगळ्या उपचार पद्धतीने ते दवाखान्यातील देवदूतच असल्याची भावना रुग्णालयात मागील ३४ दिवसांपासून उपचार घेतल्यानंतर मंगळवारी सुटी होऊन सुखरूप घरी परतलेल्या गजानन भोपये या तरुण रुग्णासह अन्य रुग्णांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर म्हणजे अर्धे लक्ष त्यांच्या खाजगी दवाखान्याकडे व अर्धे लक्ष नोकरीकडे असे असतात. मात्र राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. लांजेकर हे मागील वर्षांपासून राजुरा उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात डेडीकेटेड कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत आहेत. ते रुग्णांना कोरोनावरील औषधोपचारासह त्याला पर्यायी इतर औषधोपचार देत होते. आदर्श डॉ. हिंमत्तराव बाविस्कर यांच्या औषधोपचार पद्धतीनुसार उपचार करीत आहे. स्वतः प्रत्येक रुग्णांजवळ जाऊन वाफारा देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, हिंमत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. खालावलेली ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे दिली जात आहे.

उपजिल्हा रुग्णालयात ८९-९४ ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांनाच दाखल करता येत होते. मात्र, जिल्हा पातळीवर रुग्णांना दाखल करण्यासाठी जागेची कमतरता असल्याने याठिकाणी ५५-६० ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांना दाखल करीत आहे. २ एप्रिलपासून आतापर्यंत येथे १८५ रुग्णांना दाखल केले असून १३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर इतर रूग्णांना चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. तर २२ रुग्ण मृत पावले आहे. आतापर्यंत ५० पेक्षा जास्त वयोगटातील ४५ रुग्ण बरे झाले आहेत. मागील ३४ दिवसांपूर्वी चुनाळा येथील युवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांची ४८-५० ऑक्सिजन पातळी होती. याच रुग्णाचे ऑक्सिजन (दि.२४) ९५-९६ झाले असून त्यांना डिस्चार्ज प्रमाणपत्र देऊन सुटी देण्यात आली. यावेळी चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर व रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारी यांनी त्यांना शुभेच्छा देत निरोप दिला.

रुग्णांना नियमित उपचार पद्धतीत बदल करून परिस्थितीनुसार औषधोपचार केला जात आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून प्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताच्या घडीला १८ रुग्ण दाखल असून ४८ ऑक्सिजन असलेल्या रुग्णांची पातळी ९६ झाली असून तो घरी परतला आहे.

-डॉ. विवेक लांजेकर, वैद्यकीय अधिकारी.

मी बाहेर गावावरुन आलो असता मला ताप व श्वास घेण्यास त्रास होता. यामुळे मी दवाखान्यात जाऊन तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह व ऑक्सिजन पातळी ४८ होती. सरपंच बाळनाथ वडस्कर यांच्या मदतीने दवाखान्यात दाखल झालो असता डॉक्टरांच्या उपचाराने ३४ दिवसानंतर सुखरूप घरी आलो आहे. डॉ. लांजेकर यांनी उत्तम प्रकारे उपचार व हिंमत दिली .

- गजानन भोयपे, बरा झालेला रुग्ण, चुनाळा.

Web Title: Coronavirus positive story; Life saving for the youth after 34 days of long treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.