चंद्रपुरातील शासकीय रक्तपेढीला कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:00 AM2020-03-19T06:00:00+5:302020-03-19T06:00:41+5:30

दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक्तपेढ्या आहेत. शासकीय रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींचीही अवस्थाही बिकट आहे.

Coroner hits government blood bank in Chandrapur | चंद्रपुरातील शासकीय रक्तपेढीला कोरोनाचा फटका

चंद्रपुरातील शासकीय रक्तपेढीला कोरोनाचा फटका

Next
ठळक मुद्देदिवसाला केवळ १० ते १२ डोनर : दररोज ४० ते ५० बाटलची रुग्णालयाला गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जगभर कोरोनाने थैमान घातले असून शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा, महाविद्यालय बंद केले आहे. तर व्यावसायिकांनाही आपले प्रतिष्ठाने बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. याचा परिणाम रक्तदान शिबिर किंवा स्वच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येवर झाला असून चंद्रपूर शासकीय रुग्णालयातत काही दिवसात रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे.
दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक्तपेढ्या आहेत. शासकीय रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींचीही अवस्थाही बिकट आहे.
औद्योगिक जिल्हा असल्याने दररोज अपघात तसेच इतरही घटना सारख्या घडतात. अशावेळी रुग्णांना रक्ताची गरज भासते. शासकीय रुग्णालयामध्ये बाळंतपणे तसेच अत्यावश्यक रुग्णांसाठी रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे रक्तदात्यांच्या तुलनेमध्ये रक्ताची मागणी वाढत असल्यामुळे आणि सध्यास्थिती शासकीय रक्तपेढीमध्ये पाहिजे तेवढा रक्तसाठा नसल्यामुळे येत्या काही दिवसामध्येच रक्ताची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कोरोनामुळे रक्तदातेही धास्तावले
सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे.त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशावेळी रक्तदातेही रक्तदान करण्यासाठी तयार नाही. सामान्य वेळी ३० ते ४० रक्तदाते स्वच्छेने रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी येत होते. आता मात्र ही संख्या घटली असून सरासरी केवळ १० ते १२ रक्तदातेच दररोज रक्तदान करण्यासाठी येत आहे.

भीती बाळगू नका, रक्तदान करा
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अपघात तसेच इतर आजारासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. अशावेळी भरपूर प्रमाणात रक्तदात्यांची गरज असते. मात्र याच दिवसामध्ये रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते.त्यामुळे या दिवसामध्ये रक्तदान करणे गरजेचे आहे. यावेळी कोरोनामुळे भितीयुक्त वातावरण आहे. परिणामी रक्तदाते रक्तदान करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात येत नाही. रक्तदात्यांनी भिक्ती बाळगू नका, रक्तदान करा, आपल्या रक्तदानामुळे दुसºयांचा जीव वाचू शकतो.
- डॉ. प्रेमचंद, ब्लड बँक अधिकारी, मेडिकल कॉलेज, चंद्रपूर

Web Title: Coroner hits government blood bank in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.