कोरपना, जिवतीत काँग्रेस तर गोंडपिंपरीत भाजपची सत्ता

By admin | Published: January 30, 2016 01:08 AM2016-01-30T01:08:22+5:302016-01-30T01:08:22+5:30

कोरपना, जिवती व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. शुक्रवारी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली.

Corpana, Congress in Jivat and BJP's ruling BJP in Gondi | कोरपना, जिवतीत काँग्रेस तर गोंडपिंपरीत भाजपची सत्ता

कोरपना, जिवतीत काँग्रेस तर गोंडपिंपरीत भाजपची सत्ता

Next

नगराध्यक्षांची निवडणूक : नंदा बावणे, गजानन जुमनाके, संजय झाडे बनले नगराध्यक्ष
कोरपना/जिवती/गोंडपिंपरी : कोरपना, जिवती व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. शुक्रवारी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यात कोरपना व जिवती येथे काँग्रेस पक्षाचे तर गोंडपिंपरी येथे भाजपाच्या उमेदवाराने बाजी मारत नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडली.
१० जानेवारीला कोरपना, गोंडपिपरी व जिवती अशा ३ नव्याने स्थापीत नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या. तिनही नगरपंचायतीत १७ सदस्य आहेत. कोरपना नगर पंचायतमध्ये काँग्रेस १४, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेतकरी संघटना-१ व अपक्ष-१ असे पक्षीय बलाबल होते. यात नगराध्यपदी काँग्रेसच्या नंदा विजय बावणे तर उपाध्यक्षपदी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मसूद अली यांची अविरोध निवड करण्यात आली.
जिवती नगरपंचायतीत काँग्रेस १०, राष्ट्रवादी काँग्रेस ४ व भाजपा-३ असे पक्षीय बलाबल होते. शुक्रवारी पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे गजानन गोदरू जुमनाके यांनी राष्ट्रवादीचे अमर राठोड यांचा १० विरुद्ध ७ असा पराभव करत सत्ता काबीज केली. तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे दत्ता राठोड विजयी झाले. त्यांनी भाजपच्या नगरसेविका राठोड यांचा १० विरुद्ध ७ ने पराभव केला.
गोंडपिपरी नगरपंचायतीची पहिली निवडणूक बिनविरोध पार पडली. नगराध्यक्षपदी संजय झाडे तर उपाध्यक्षपदी चेतन गौर या भाजप उमेदवारांची अविरोध निवड झाली. येथे भाजपाचे सहा व अपक्षाचे सात असे समीकरण जुळविण्यात आले. नगराध्यपदासाठी भाजपकडून संजय झाडे यांनी तर शिवसेनेच्या शोभा संकुलवार यांनी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे तीन व काही अपक्ष नगरसेवकांना हाताशी घेत सत्तेसाठी शिवसेनेने खटाटोप केला. मात्र गणित न जुळल्याने गुरूवारी शोभा संकुलवार यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे संजय झाडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी चेतन गौर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Corpana, Congress in Jivat and BJP's ruling BJP in Gondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.