मनपाकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:04+5:302021-06-04T04:22:04+5:30

चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेवा सप्ताहअंतर्गत महानगर पालिकेमार्फत कोरोना योद्ध्यांचा ...

Corporation felicitates Corona Warriors | मनपाकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार

मनपाकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार

Next

चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेवा सप्ताहअंतर्गत महानगर पालिकेमार्फत कोरोना योद्ध्यांचा भेटवस्तू देऊन गुरुवारी सत्कार केला.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, शिव मोक्षधाम स्मशानभूमीचे अध्यक्ष अजय वैरागडे, सचिव श्याम धोपटे आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत केला जात आहे. पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर शिव मोक्षधाम स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर त्यांच्या धर्मातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येतो. महानगरपालिकेमार्फत लाकूड, डिझेल, पीपीए कीट, बॉडी कव्हर आणि अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य मोफत पुरविण्यात येते. अशा दुःखद आणि भावनिकप्रसंगी मनपा जनतेच्यासोबत असल्याचे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. म्युकरमायकोसिस आजार कोरोनापेक्षाही भयंकर असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. यापूर्वी शहरात लस घेतलेल्या नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. कार्यक्रमाला स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, झोन २ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, प्रवीण हजारे आदी उपस्थित होते.

Web Title: Corporation felicitates Corona Warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.