पाच दिवसात २५० नागरिकांवर मनपाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:01+5:302021-03-13T04:51:01+5:30
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादर्भाव वाढत आहे. हा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मास्क तसेच सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्क आहे. मात्र आजही नागरिक ...
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादर्भाव वाढत आहे. हा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मास्क तसेच सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्क आहे. मात्र आजही नागरिक बेफीकीरी करीत आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेले नियम मोडणारे सध्या महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या रडारवर आहे. मागील पाच दिवसात महापालिकेच्या सात पथकाद्वारे २५० नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे किमान नागरिकांनी स्वत:हून सतर्क रहाणे सध्यातरी गरजेचे आहे.
मागील काही दिवसामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना नियंत्रणासाठी मास्क वापरणे, गर्दी टाळणे यासह इतर नियम शासनाने लागू केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. चंद्रपूर महापालिके अंतर्गत ३ झोन असून सात पथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे. मागील पाच दिवसामध्ये २५० नागरिकांवर कारवाई करून महापालिकेने आपल्या तिजोरीमध्ये १४ हजार ५०० रुपयांची भर पाडली आहे. असे असले तरी आजही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसून मास्क न लावताच बाहेर फिरताना दिसून येत आहे. त्यामुळे महापालिकेने कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे.
-
विद्यार्थीही मास्क शिवायच शाळेत
घराबाहेर पडताना मास्क लावणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने वारंवार नागरिकांना आवाहन करीत आहेत. मात्र नागरिक आजही बेफिकिरी करीत आहे. विशेष म्हणजे, काही विद्यार्थीही शाळेत जाताना मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिकेसह शाळा प्रशासनानेही कठोर होणे सध्यातरी गरजेचे आहे.
बाक्स
कारवाई
२५०
दंड वसूल
१४,५००
कोट
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने विमानास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स ठेवून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. शेजारील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनारुग्ण आढळत असल्याने प्रत्येकांनी सतर्क रहाणे आवश्यक आहे.
-संतोष गर्गेलवार
स्वच्छता अधिकारी, महापालिका चंद्रपूर