मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:25+5:302021-05-14T04:27:25+5:30

चंद्रपूर : शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून रुग्णसेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या परिचारिका रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून ...

Corporation nurses will get holiday pay | मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन

मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन

Next

चंद्रपूर : शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून रुग्णसेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या परिचारिका रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून त्या कोणतीही सुटी न घेता सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले.

आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस १२ मे हा संपूर्ण जगात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर परिचारिका दिनानिमित्त महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात बुधवारी त्या कौतुक सोहळ्यात बोलत होत्या. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपायुक्त विशाल वाघ आदी उपस्थित होते.

महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या की, कोविड १९ च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत परिचारिका रुग्णसेवेत परिश्रम घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून काम करीत आहेत. या योगदानाचे कौतुक करावे तितके कमी आहे. सण-उत्सवातील सुट्यांचे दिवसदेखील कुटुंबियांसोबत घालविता आले नाहीत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर कंचर्लावार यांनी दिले. तुमच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा. तुमचे हे योगदान कदापि विसरणार नाही, अशा शब्दात स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी परिचारिकाविषयी कौतुकोद्गार काढले. उपायुक्त विशाल वाघ यांनी कोविडच्या या संकटात घर, कुटुंबाचे बंधन बाजूला ठेवून, जिवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परिचारिकांनी मनोगत व्यक्त केले. कोविडमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते डॉ. जयश्री वाडे, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत यांच्यासह परिचारिका आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. जनबंधू तर संचालन शरद नागोसे यांनी केले.

Web Title: Corporation nurses will get holiday pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.