मनपाच्या परिचारिकांना मिळणार सुट्यांचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:27 AM2021-05-14T04:27:38+5:302021-05-14T04:27:38+5:30
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून रुग्णसेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या परिचारिका रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून ...
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात कोरोनाचे संकट आल्यापासून रुग्णसेवा देण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या परिचारिका रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. मागील वर्षभरापासून त्या कोणतीही सुटी न घेता सेवाकार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले. परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपायुक्त विशाल वाघ आदी उपस्थित होते.
परिचारिकांना सण-उत्सवातील सुट्यांचे दिवसदेखील कुटुंबीयांसोबत घालविता आले नाहीत. त्यांच्या या कार्यासाठी आठवडाभरात सुट्यांचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.
तुमचे हे योगदान कदापिही विसरणार नाही, अशा शब्दांत स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी रुग्णसेवेत अथक् परिश्रम घेणाऱ्या परिचारिकांविषयी कौतुकोद्गार काढले. उपायुक्त विशाल वाघ यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते डॉ. जयश्री वाडे, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत यांच्यासह परिचारिका आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. जनबंधू, संचालन शरद नागोसे यांनी केले.