नगरसेवक हरवले, कुणाला सापडल्यास त्वरीत संपर्क साधावा; चंद्रपुरात झळकला फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:31 AM2017-11-24T10:31:06+5:302017-11-24T10:33:53+5:30

भद्रावती शहरातील विंजासन नेताजीनगर या प्रभागातील एकूण चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हरविले असून कुणाला सापडल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, अशा आशयाचे दोन बॅनर या प्रभागात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहे.

Corporators are lost, if possible, get in touch immediately; Banner in Chandrapur | नगरसेवक हरवले, कुणाला सापडल्यास त्वरीत संपर्क साधावा; चंद्रपुरात झळकला फलक

नगरसेवक हरवले, कुणाला सापडल्यास त्वरीत संपर्क साधावा; चंद्रपुरात झळकला फलक

Next
ठळक मुद्देनिवडणुकीनंतर कधीच फिरकले नाहीतअज्ञात व्यक्तीच्या या कृत्यावर सर्व नागरिक प्रसन्न

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : भद्रावती शहरातील विंजासन नेताजीनगर या प्रभागातील एकूण चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हरविले असून कुणाला सापडल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, अशा आशयाचे दोन बॅनर या प्रभागात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात कधीही फिरकले नाही, अशा निष्क्रीय नगरसेवकांना बॅनरच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने चांगलाच टोला हाणला आहे. भद्रावती पालिकेच्या विंजासन प्रभागात संजय आसेकर, सुधीर सातपुते, माधुरी कळमकर व अर्चना आरेकर, असे चार नगरसेवक आहेत. यापैकी सुधीर सातपुते वगळता इतर तिन्ही नगरसेवकांनी प्रभागाकडे पाठ फिरविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बॅनरच्या माध्यमातून त्यांच्याकडे अप्रत्यक्ष इशारा करुन त्यातून या नगरसेवकांवर निष्क्रीयतेचा आरोप करण्यात आला आहे. संजय आसेकर हे रॉकाकडून निवडून आल्यानंतर त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्यानंतर भद्रावती सोडून चंद्रपूर शहरात राहण्यास गेले. माधुरी कळमकर या शिवसेनेकडून निवडून आल्या. त्यानंतर मुलीच्या प्रकृतीमुळे काही दिवसातच प्रभाग सोडून त्या आयुधनिर्माणी वसाहतीत राहण्यास गेल्या. अर्चना आरेकर या काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या. मात्र त्या या प्रभागात राहत असल्या तरी प्रभागाचा काही विशिष्ट भाग वगळता अन्य भागात त्यांचा संपर्क नाही, असे नागरिक सांगतात. त्यामुळे अज्ञात इसमाने तिनही नगरसेवक निष्क्रीय असल्याचा ठपका ठेवून बुद्धलेणीच्या प्रवेश द्वारासमोर व विंजासन येथील गांधी चौकातील मंदिरसमोर नगरसेवक हरविल्याचे बॅनर लावले आहे.

Web Title: Corporators are lost, if possible, get in touch immediately; Banner in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.