रिलायन्स जीओवरून महापौरांना नगरसेवकांचे आव्हान

By admin | Published: June 28, 2014 02:25 AM2014-06-28T02:25:23+5:302014-06-28T02:25:23+5:30

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात में रिलायन्स जीओकडून उभारण्यात येणाऱ्या १०० टॉवरच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने ...

Corporator's challenge from the Mayor of Reliance Geo | रिलायन्स जीओवरून महापौरांना नगरसेवकांचे आव्हान

रिलायन्स जीओवरून महापौरांना नगरसेवकांचे आव्हान

Next

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात में रिलायन्स जीओकडून उभारण्यात येणाऱ्या १०० टॉवरच्या उभारणीसाठी महानगरपालिकेने दिलेल्या मंजुरीवरून चंद्रपुरातील महानगर पालिकेतील

राजकारण पेटणार अशी चिन्हे दिसत आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या आमसभेतील हा मंजुरीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी करणाऱ्या २९ नगरसेवकांच्या पत्राने शुक्रवारी या विषयावरून

खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मागणी करणारे बहुतेक नगरसेवक काँग्रेसचे असल्याने महापौर संगिता अमृतकर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष रामू तिवारी चांगलेच अडचणीत येणार,

असे दिसत आहे.
मनपातील २९ नगरसेवकांनी महापौरांच्या नावाने दिलेल्या या पत्रातून १०० टॉवरच्या उभारणीवर आक्षेप घेतला आहे. वैज्ञानिक कारणांचा हवाला देत, ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने अत्यंत

धोकादायक आहे. फोर-जी यंत्रणा असलेल्या या टॉवरमधून पसरणाऱ्या लहरी भविष्यात चंद्रपूरकरांचे आरोग्य कोलमडून टाकतील. त्यामुळे २९ मेच्या आमसभेतील ठराव रद्द करावा, अशी

मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
दरम्यान, सर्वपक्षीय नगरसेवकांचे शिष्ठमंडळ आज शुक्रवारी मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांना भेटले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. महापौर संगीता अमृतकर यांना

भेटण्यासाठीही हे शिष्ठमंडळ गेले होते, मात्र त्या कक्षात उपस्थित नव्हत्या. हा ठराव मागे न घेतल्याने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही या नगरसेवकांनी दिला आहे. महापौर संगिता

अमृतकर, उपमहापौर संदीप आवारी, स्थायी समितीचे सभापती रामू तिवारी, गटनेता तसेच नगरसेवकांनी मोबाईल टॉवरमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नव्हती,

असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. या प्रकाराचा विरोध करणाऱ्यांमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेनेसह अन्य नगरसेवकांचाही समावेश आहे. प्रवीण पडवेकर, अशोक नागापुरे, प्रशांत दानव,

अनिता कथडे, शिल्पा आंबेकर, उषा धांडे, विणा खनके, गजानन गावंडे, डॉ. महावीर सोईतकर, समीना अंसारी, राजेश अडूर, रमावती यादव, राजेश रेवेल्लीवार, महेंद्र जायसवाल, देवीदास

गेडाम, अनिल रामटेके, सुनीता अग्रवाल, एकता गुरले, मनोरंजन राय, लक्ष्मी पारनंदी, सुभेदिया कश्यप, राखी कंचर्लावार, लता साव, अजय खंडेलवाल, संगिता पेटकुले, योगिता मडावी, दुर्गेश

कोडाम तथा आकाश साखरकर आदी नगरसेवकांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. (ंजिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Corporator's challenge from the Mayor of Reliance Geo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.