उभ्या बसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च महामंडळाच्या माथीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:16+5:302021-06-03T04:20:16+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा असे चार आगार आहेत. या चार आगारांतून शेकडो बसफेऱ्या धावतात. त्यातून महामंडळाला मोठे ...
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा असे चार आगार आहेत. या चार आगारांतून शेकडो बसफेऱ्या धावतात. त्यातून महामंडळाला मोठे उत्पन्न मिळत होते. परंतु, मागील वर्षी देशात कोरोना आला. त्यामुळे पहिल्यांदाच बसफेऱ्यांची चाके थांबली. त्यामुळे मोठा फटका महामंडळाला बसला. त्यातच मागील एक वर्षापासून मोजक्याच बसफेऱ्या धावत आहेत. त्यामुळे मागील वर्षांपासून अनेक बस आगारातच आहेत. मात्र सलग बसफेऱ्या बंद असल्याने देखभाल दुरुस्तीसह टायर बदलण्याचा खर्च वाढला आहे.
बसमध्ये बिघाड होऊ नये, म्हणून महामंडळाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. लॉकडाऊन कालावधीत यांत्रिकी विभागात ५० टक्के तत्त्वावर कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे हे कर्मचारी बसची देखभाल करीत होते. परिणामी बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या. परंतु, काही बसची देखभाल दुरुस्ती करावी लागली याचा विनाकारण महामंडळाला फटका बसला.
बॉक्स
जिल्ह्यातील आगार ४
एकूण बसची संख्या
बॉक्स
वर्षातून फक्त दोन महिने रस्त्यावर
मागील मार्च २०२० मध्ये बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात काही बसेस सुरू झाल्या. परंतु, एक-दोन महिने बस धावल्यानंतर लगेच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा या बस आगारामध्येच धूळखात पडून होत्या. आता ५० टक्के तत्त्वावर काही प्रमाणात बसफेऱ्या सुरू आहेत.
बॉक्स
नियमित खर्च सुरूच
लॉकडाऊन असल्याने ५० टक्के तत्त्वावर यांत्रिक कर्मचारी बोलविण्यात येत होते. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नेहमीच बसची देखभाल व दुरुस्ती होत होती.
प्रत्येक बसला मेटेनन्स किरकोळ खर्च सुरूच आहे. त्यात काही बसचे टायर बदलणे, बस सीटची दुरुस्ती, स्वच्छता आदी कामे करण्यात येत आहेत.
बॉक्स
आधीच दुष्काळ
सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून एसटी महामंडळाकडे बघितले जाते. परंतु, दरवर्षीच हे महामंडळ घाट्यात असते. त्यातच मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्याने एक वर्षापासून बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे उत्पन्न बंद आहे. मालवाहतुकीतून थोडेफार उत्पन्न येत असले तरी अद्यापही महामंडळाला उभारी मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा एकाच जागी असलेल्या बसफेऱ्यांची देखभाल दुरुस्ती करावी लागत असल्याने आर्थिक संकटाला सामोर जावे लागत आहे.
बॉक्स
मागील एक वर्षापासून लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या धावल्या नाहीत. त्यामुळे अनेक बसफेऱ्या मागील वर्षभरापासून एकाच जागी उभ्या आहेत. त्यामुळे काही बसच्या टायरची समस्या निर्माण झाली आहे. तर काही बसमध्ये इंजिनमध्ये बिघाड आले, सीट तुटत्या, तर काही बसचीच दुरवस्था झाली आहे. परंतु, महामंडळाच्या यांत्रिक विभागातर्फे दुरुस्ती करण्यात आल्याने बसफेऱ्या प्रवाशांसाठी धावत आहेत.