कापूस व सोयाबीनची उतारी घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:36 PM2017-08-21T22:36:53+5:302017-08-21T22:37:34+5:30

सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले.

Cotton and soybeans will fall | कापूस व सोयाबीनची उतारी घटणार

कापूस व सोयाबीनची उतारी घटणार

Next
ठळक मुद्देवरूणराजा कोपला : शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर

प्रवीण खिरटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : सध्याच्या हंगामात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यात कापूस व सोयाबीन पीक तग धरून आहे. शेंगा व पात्या लागणे सुरू झाले. परंतु पाऊस नाही व उष्णता वाढत असल्याने जमिनीत भेगा पडून सोयाबीनच्या शेंगात दाणे भरणार नाही व कापसाच्या पात्या गळून पडू लागल्याने यावर्षी कापूस व सोयाबीन पिकाची उतारी घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भात पीक हातून गेल्याने शेतकरी संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे.
हंगामात रोखीचे पीक म्हणून कापूस व सोयाबीन, तुर या पिकाकडे शेतकरी बघत असतात. सोयाबीन पीक कमी खर्चात होऊन लवकर उत्पादन हातात येत असल्याने शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहे. यावर्षीसुद्धा सोयाबीन, कपाशी, तूर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरूवातीला पाऊस पडल्याने पिकाची पेरणी करण्यात आली. अधेमधे पाऊस पडत असल्याने व पिकांची मशागत शेतकºयांनी चांगल्याप्रकारे केल्याने पिकाची स्थिती चांगली आहे. आता कपाशीला पात्या लागणे, सोयाबीनला शेंगा लागत आहे. अशातच पावसाने दडी मारली आहे. उष्णतेमध्ये भर पडत असल्याने जमिनीला भेगा पडत आहे. त्यामुळे कपाशीच्या पात्या गळून पडत आहे तर सोयाबीनच्या शेंगामध्ये दाणे भरत नाही.
येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर कपाशी व सोयाबीन पिकाच्या उतारीत घट होवून त्यावर लागलेला खर्चही निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे शेतकºयांच्या मनात धडकी भरली आहे.
धानाला सर्वाधिक फटका
धान पीक घेण्याकरिता पºहे टाकावे लागते. शेतकºयांनी पºहे टाकले. पाऊस अचानक बेपत्ता झाला. जवळच्या पाण्याने पºहे वाचविण्याची धावपळ सुरू झाली. परंतु बांध्यामध्ये रोवणी करता आली नाही. त्यामुळे शेतकºयांनी आता भात पिकाऐवजी चना व गहु पिकासाठी आपली जमीन सज्ज करून ठेवल्याचे दिसून येत आहे.
जनावरांना घरीच पाजावे लागते पाणी
पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेताच्या परिसरात असलेले नाले, बोड्या याध्ये पाणीसाठा नाही. त्यामुळे शेतकºयांना आपली पाळीव जनावरे आजही पावसाळ्यात घरी आणून पाणी पाजावे लागत आहे.
शेतकºयांमध्ये पाण्यासाठी भांडणे
सध्याचा हंगाम पावसाळ्याच्या हंगाम म्हणून ओळखला जातो. काही धरणातील पाणी सध्या कॅनलने सोडले जात आहे. आता पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने ओलिताच्या पाण्यावरून शेतकºयांमध्ये भांडणे होवून पोलिसात तक्रारीही दाखल झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

कापूस व सोयाबीन वाढीच्या अवस्थेत आहे. पावसाची आवश्यकता आहे. भात पिकाची रोवणी पावसाअभावी रखडलेली आहे.
- व्ही. आर. प्रकाश, तालुका कृषी अधिकारी, वरोरा
पाऊस नसल्याने उष्णतेमध्ये वाढ झाली. त्यामुळे शेंगामध्ये दाणे भरणे प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. पात्या गळत आहे. जमिनीला भेगा पडणे सुरू आहे. पावसाअभावी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
- मधुकर भलमे, प्रगतशील शेतकरी, चारगाव (खु)

Web Title: Cotton and soybeans will fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.