वादळी पावसामुळे कापसाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:18 AM2017-09-22T00:18:57+5:302017-09-22T00:19:11+5:30

भद्रावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील कपाशीची झाडे झुकली तर अनेक झाडे तुटली.

Cotton damage due to rainstorms | वादळी पावसामुळे कापसाचे नुकसान

वादळी पावसामुळे कापसाचे नुकसान

Next
ठळक मुद्देजोरदार वादळ व पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील कपाशीची झाडे झुकली तर अनेक झाडे तुटली.

लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतातील कपाशीची झाडे झुकली तर अनेक झाडे तुटली. फळधारणा झालेल्या कापूस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी कापूस, सोयाबिन, तुरीचे पीक भुईसपाट झाले.
तालुक्यातील विंजासन, चारगाव, कुनाडा, चिरादेवी, ढोरवासा, केसुर्ली, कुरूडा, कोंढा, गोरजा, कोंढाली, ताडाळी, कुडरारा, घोडपेठ परिसरात कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. झाडे आडवी पडलेली असून पुढील हंगाम करणे शेतकºयांना कठीण झाले आहे. अनेक शेतकरी पडलेली झाडे उभी करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. झाडे उभी केल्यावर पुन्हा झाडे मरण्याची भीती असल्याने ती उभी करावी की नाही, अशीही भीती त्यांच्या मनात आहे.
विंजासन येथील सुधीर सातपुते व जगन दानव यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक झाडे खाली पडल्याचे आढळून आली. पडलेली झाडे उभी करण्यात येत असलेले दृष्य अनेक शेतामध्ये दिसून येत होते. गोरजा येथे तर शेतकरी सहकुटुंब झाडे उभी करण्याच्या प्रयत्नात होती. नविन फुटवे आल्यानंतर शेतात पिकांची गर्दी झाल्यास शेतातील कामे करण्यास अडचण निर्माण होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले. शासनातर्फे संबंधित शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याकडे त्वरित लक्ष देऊन विमा कंपन्यांना झालेल्या नुकसानीचा अहवाल द्यावा व शेतकºयांना त्यांची नुकसान भरपाई मिळवून द्यावी.
- सुधीर सातपुते शेतकरी, विंजासन

Web Title: Cotton damage due to rainstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.