कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:57 PM2017-09-23T23:57:22+5:302017-09-23T23:57:35+5:30
देशात कापसाच्या लागवडीची खरी सुरवात मोहजोंदडो व हडप्पाच्या कालावधी पासूनच झाली आहे. इतर देशापेक्षा भारतात कापूसाचे पीक घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : देशात कापसाच्या लागवडीची खरी सुरवात मोहजोंदडो व हडप्पाच्या कालावधी पासूनच झाली आहे. इतर देशापेक्षा भारतात कापूसाचे पीक घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र इजिप्तमध्ये सर्वांत जास्त कापसाचे पीक घेतले जाते. तेथील शेतकरी कापूस पिकाला देव मानतात, मात्र आपण अत्यल्प पीक घेतो. देव मानत नाही. पूर्वी भारतातल्या कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नव्हती. मात्र आता कापसाची मागणी वाढली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कापसाला ३३ करोड क्राप होता. आता हल्ली ४० करोडच्या जवळपास क्राप आहे. भारताने अद्यावत तंत्रज्ञान अवगत केल्यामुळे शेतकºयांच्या कापसाची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आहे. असे प्रतिपादन इंडीयन कॉटन फेडरशन कोईमतुर तामीलनाडुचे डायरेक्टर अशोक डागा यांनी केले.
चिमूर कॉटन इंडस्ट्री व कापूस जिनिंग व प्रेसींग युनीट यांच्या वतीने आयोजीत शेतकरी मेळावा, मार्गदर्शन, व चर्चासत्र या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन बॅक आॅफ महाराष्ट्र चंद्रपूरचे झोनल व्यवस्थापक अरूण कबाडे यांचे हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बल्लापूरचे मंडळ कृषी अधिकारी एम. एस. वरभे, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे डॉ. मनोज जोगी, एस. वाय. माळी, कुबोटा ट्रक्टर पूणे चेटेरीटरी मॅनेजर गौरव बडगे, चिमूर बॅक आॅफ महाराष्ट्रचे मॅनेजर खापेकर, तर विशेष अतीथी म्हणून संजय देवाळकर, रामभाऊ ठाकरे, दादाराव भलमे, भाऊराव पाकमोडे आदी उपस्थित होते.
यावेळी कापूस पूरवठादार, गाडी चालक मालक, प्रगतशील शेतकरी यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक अनिल मेहर, संचालन कामडी, व उपस्थिताचे आभार आश्विन ठाकरे यांनी मानले.