कापूस ८०० रुपयांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:01 AM2019-04-05T01:01:29+5:302019-04-05T01:01:55+5:30

मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सद्या कापूस सहा हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रुपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाढीचा दराचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी व्यापाऱ्यांनाच होत आहे.

Cotton increased by Rs 800 | कापूस ८०० रुपयांनी वाढला

कापूस ८०० रुपयांनी वाढला

Next
ठळक मुद्देगुढीपाडव्याची प्रतीक्षा : कापसाचा भाव ६ हजार २०० वर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सद्या कापूस सहा हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रुपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाढीचा दराचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी व्यापाऱ्यांनाच होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. मात्र दर अत्यल्प असल्याने शेतकरी चिंतातूर होते. अशातच त्यांनी आपल्या जवळील कापूस विकला असताना आता काही प्रमाणात कापसाचे दर वाढले आहे.
शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर वाढण्यास सुरुवात झाली. कापसाचे दर तूर्तास सहा हजार रुपये क्विंटलच्यावर पोहचले आहेत. या दरात आणखी किती वाढ होते, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सामान्य शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापसाची विक्री केली आहे. बहुतांश कापूस व्यापाऱ्याजवळच साठवून आहे. त्यांनाच या वाढीव दराचा लाभ होत होत आहेत.
दर वाढण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरिता काढला. शेतकऱ्यांकडील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर चढले आहे. राज्यातील काही बाजारपेठेत अशीच स्थिती आहे. सरकीचे दर वधारल्याने कापसाच्या दरात वाढ झाली. तसेच रुपयाचे अवमूल्यन कायम असल्याने दरात तेजी आल्याचे सांगितले जाते.

पाडव्यानंतर विक्रीस येणार कापूस
काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे आता कापूस साठवून आहे. हे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे गुढीपाडव्यापर्यंत कापूस दर काय राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कमी भावातच कापूस विक्री केल्याने त्याच्या लाभापासून ते वंचित आहे.

Web Title: Cotton increased by Rs 800

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस