कापूस बाजारपेठेचे गतवैभव प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:47 PM2017-10-14T23:47:45+5:302017-10-14T23:48:14+5:30

एकेकाळी विदर्भात कापूस बाजारपेठ म्हणून वरोरा शहराची ओळख होती. कालांतराने यामध्ये अनेक कारणाने खंड पडला.

Cotton market has achieved the ultimate goal | कापूस बाजारपेठेचे गतवैभव प्राप्त

कापूस बाजारपेठेचे गतवैभव प्राप्त

Next
ठळक मुद्देवरोरा बाजारपेठ : कापसाची आवक वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : एकेकाळी विदर्भात कापूस बाजारपेठ म्हणून वरोरा शहराची ओळख होती. कालांतराने यामध्ये अनेक कारणाने खंड पडला. आता काही वर्षापासून व याही वर्षी चालू हंगामात कापसाची आवक वाढली असल्याने वरोरा शहराला कापसाची बाजारपेठ म्हणून गतवैभव प्राप्त झाला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सहा खासगी जिनिंग आहे. चालू हंगामात वरोरा शहरात व माढेळी येथील प्रत्येकी दोन अशा चार जिनिंगमध्ये कापसाच्या खरेदीला दसºयाच्या मुहर्ताला सुरुवात करण्यात आली. आजपर्यंत दहा हजार ३४८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. त्यात पारस वरोरा १८३२.८९ क्विं., रविकमल ७५३.४३, पारस माढेळी ५०५३.४३, आशा पुरा माढेळी २७०८ क्विंटल कापसाचा समावेश आहे. मागील वर्षी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत पाच लाख ८४ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला होता. मात्र यंदा आतापर्यंतच बºयापैकी कापूस खरेदी झाली आहे. त्यामुळे यावर्षी अधिक कापसाची आवक वरोरा व माढेळी येथील केंद्रावर होण्याची शक्यता आहे. शेतकरी या केंद्रालाच पसंती दर्शवित आहे.
शुक्रवारी माढेळी येथे पाच हजार क्विंटल तर वरोरा येथे तीन हजार क्विंटल कापसाची आवक असल्याची माहिती वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विशाल बदखल यांनी दिली.
हमीभावापेक्षा अधिक भाव
शासनाने कापसाला ४३२० रुपये प्रतिक्विंटल हमी भाव जाहीर केला. वरोरा परिसरातील जिनिंग संचालक ४५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापूस बघून भाव देत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक वरोरा येथील केंद्राला प्राधान्य देत आहे.

Web Title: Cotton market has achieved the ultimate goal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.