बाजारपेठेअभावी कापूस परप्रांतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:48 PM2017-11-14T22:48:44+5:302017-11-14T22:48:55+5:30

कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भ प्रांतात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस हेच या भूमीतल्या शेतकºयांचे नगदी पीक आहे.

Cotton in the province due to lack of markets | बाजारपेठेअभावी कापूस परप्रांतात

बाजारपेठेअभावी कापूस परप्रांतात

Next
ठळक मुद्देजिल्ह्याला बाजारपेठ मिळेना : शेतकºयांना बसतो प्रवासाचा आर्थिक भुर्दंड

प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कापूस उत्पादकांचा जिल्हा अशी विदर्भ प्रांतात चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. कापूस हेच या भूमीतल्या शेतकºयांचे नगदी पीक आहे. मात्र शेतकºयांना गेल्या अनेक वर्षांपासून कापूस विकण्यासाठी हक्काची मोठी बाजारपेठ मिळालेली नाही. यामुळे बरेच शेतकरी परप्रांतात कापूस विक्रीसाठी नेतात. चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस शेतकºयांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास ही समस्या सुटेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असते. जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या पिकाच्या उत्पादनावर शेतकºयांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असते.
विदर्भाच्या सुपिक मातीला पांढºया सोन्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र दरवर्षी शेतकºयांच्या कापसाला दिला जाणारा हमीभाव शेतकºयांचे कंबरडे मोडणारा आहे. शेतकºयांनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. अनेक शेतकºयांचा कापूस निघायला सुरुवात झाली आहे. मात्र उत्पादन खर्च बघता शासनाने जाहीर केलेला हमीभाव अतिशय तोकडा आहे. यातून उत्पादनावर केलेला खर्चही भरुन निघणार नाही, एवढी बिकट परिस्थिती कापूस पिकांची आहे.
दिवसंरात्र हाडाची काडी करुन काबाडकष्ट करणारा शेतकरी काळ्या मातीत पांढरे सोने पिकवतो. यामुळे कापसाला सोन्यासारखा भाव मिळणे अपेक्षीत आहे. मात्र आजपर्यंत शेतकºयांच्या पदरी कायम निराशाच आली आहे.
शेतकरी तीन-चार दशकापासून कापूस पिकवत आहे. परंतु, शेतकºयांची होत असलेली परवड अजूनही थांबलेली नाही. कापूस उत्पादकांच्या चंद्रपूर जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकºयांची मागणी आहे. मात्र शेतकºयांची ही आर्त हाक शासन दरबारी पोहोचली नाही. हे येथील शेतकºयांचे दुदैव आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस पिकवूनही बाजारपेठेअभावी तो नाईलाजाने परप्रांतात नेऊन विकावा लागतो. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कापसाची मोठी बाजारपेठ आहे.
या तुलनेत चंद्रपूर जिल्हा कापसाच्या बाजारपेठेविना अजूनही पोरका आहे. जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने इतरत्र कापूस विकायला जाण्यासाठी लागणारा प्रवास खर्च शेतकºयांचे कंबरडे मोडणारा आहे. त्यामुळे येथे मोठ्या बाजारपेठेची मागणी आहे.

मंत्र्यांकडून कापसाच्या बाजारपेठेची आशा
चंद्रपूर जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ व्हावी, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकºयांची मागणी आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्यातीलच आहेत. हे दोन बडेमंत्री सरकारमध्ये असल्याने शेतकºयांना या मंत्र्यांकडून जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ व्हावी, अशी अपेक्षा आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने नाईलाजाने कापूस परप्रांतात नेऊन विकावा लागत आहे. त्यावर होणारा आर्थिक खर्च शेतकºयांना परवडणारा नाही. त्यामुळे शासनाने योग्य पाऊल उचलून जिल्ह्यात बाजारपेठ स्थापन करणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश्वर बोबडे, शेतकरी
अंतरगाव (बु.)

Web Title: Cotton in the province due to lack of markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.