नाल्याच्या पाण्यामुळे शेतातील कापूस बीज वाहून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:20 AM2021-06-20T04:20:03+5:302021-06-20T04:20:03+5:30
देवाडा : राजुरा तालुक्यातील टेंभुरवाही तलाठी साजाअंतर्गत सोंडो गावाच्या काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे नाल्यालगत ...
देवाडा : राजुरा तालुक्यातील टेंभुरवाही तलाठी साजाअंतर्गत सोंडो गावाच्या काही अंतरावर असलेल्या शेतामध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे नाल्यालगत असलेल्या शेतात पाणी शिरले. शेतकऱ्यांनी कापसाची पेरणी केली होती. पाण्याच्या प्रवाहाने संपूर्ण बीज वाहून गेले.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रघपतू चिंनू पंधरे रा. देवाडा यांचे शेत सर्व्हे नं. ४५, एक हेक्टर, ८० आर शेती असून ती नाल्याच्या जवळ आहे. त्यांनी आताच शेतात कापसाची पेरणी केली होती. मात्र कापसाची कोंबे उगवण्यापूर्वीच नाल्याच्या वाहत्या पाण्यामुळे बिजाई वाहून गेली. यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. त्यांना पुन्हा बियाणे खरेदी करून लावावे लागत आहे. यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाने त्यांना मदत करावी, अशी मागणी आहे.