दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस अजूनही घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:07 AM2017-11-27T00:07:25+5:302017-11-27T00:07:54+5:30

Cotton is still waiting for the hike | दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस अजूनही घरातच!

दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस अजूनही घरातच!

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी हतबल : कापसाचे भाव वाढणार कधी; कापूस उत्पादक निराशेच्या गर्तेत

प्रकाश काळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : शेतकऱ्यांनी कापूस पिकविला. मात्र पाहिजे त्या प्रमाणात कापसाला भाव नसल्याने कापूस पिकावर केलेला खर्चही भरून निघणार नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरीच भरून ठेवला आहे.
यावर्षी कापसाच्या बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी आवक कमी आहे. कापूस पिकाचा उत्पादन खर्च मोठा आहे. त्या तुलनेत कापसाला मिळणारा दर अतिशय तोकडा आहे. चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलप्रमाणे खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहे. शासनाने कापसाला दिलेला हमीभाव, त्यापेक्षा अतिशय अल्प आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांचे कापूस हे नगदी पीक आहे. शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेट कापूस या एकमेव पिकांवर अवलंबून आहे. परंतु कापसाला भावच नसल्याने अतिशय अल्प दरात कापूस कसा विकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना चांगलाच सतावत आहे. कापूस वेचणाऱ्या मजुरांचे भाव गगनाला भिडले आहे. ६ ते ८ रुपये किलो प्रमाणे कापूस वेचणी सुरू आहे. कापसाला उत्पादन खर्च मोठा आहे. त्या तुलनेत कापूस पिकाला भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक चिंतेत आहेत.
कापसावरच झोपतात शेतकरी
शेतकऱ्यांच्या घरी अजूनही कापूस असल्याने घरी आता बसायलाही जागा उरली नाही. शेतकऱ्यांच्या घरी कापूस आला की त्यांना जागेची अडचण निर्माण होते. त्यामुळे सध्या कापसाच्या गंजीवरच शेतकरी कशीबशी रात्र काढताना दिसत आहेत. दुसरीकडे असा पडून असलेल्या कापसाची प्रतवारीही खराब होण्याची शक्यता असते.
राजकीय पुढारी गेले कुठे?
शेतकऱ्यांच्या शेतमालाला अजूनही बऱ्यापैकी भाव नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला कुणी तयार नाही. निवडणूक काळात शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय पुढारी शेतमालाच्या दरवाढीवर बोलताना दिसत नाही. त्यामुळे हे राजकीय पुढारी गेले कुठे, असा शेतकºयांचा सवाल आहे.

Web Title: Cotton is still waiting for the hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस