आश्वासनावर देश चालत नाही
By admin | Published: November 29, 2014 01:08 AM2014-11-29T01:08:58+5:302014-11-29T01:08:58+5:30
केवळ आश्वासन देत सामान्य लोकांची पिळवणूक करण्यासाठी भाजप सरकार सत्तेवर आले आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे.
चंद्रपूर : केवळ आश्वासन देत सामान्य लोकांची पिळवणूक करण्यासाठी भाजप सरकार सत्तेवर आले आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. केवळ आश्वासनावर हा देश चालणार नाही, दारूबंदीच्या निर्णयाचे काय झाले, असा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांना विचारला असता आम्ही एप्रिलपर्यंत करू असे उत्तर मिळत आहे. मग ज्यांनी एका महिन्यात दारू बंदी करू असे आश्वासन दिले त्यांचे काय, असे मत काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
आमदार विजय वडेट्टीवार यांची कांँग्रेसच्या उपगटनेतेपदी निवड झाल्याबद्दल व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याकरिता चंद्रपुरात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रांतीय उपाध्यक्षा रजनीताई हजारे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, सभापती रामू तिवारी, काँग्रेस गटनेते संतोष लहामगे, महामंत्री इंटक के.के. सिंग, माजी जिल्हाध्यक्ष विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक काँग्रेसचे अध्यक्ष आबीद अली, अॅड. प्रमोद आनंद, रोशन पचारे, शिवाराव सचिन कत्याल, कुणाल चहारे, विकास टिपले, छोटू शेख, दुर्र्गेश कोडाम, राजेश अडूर, करीललाला काजी आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. याप्रसंगी विनोद दत्तात्रेय, आबीद अली, के.के. सिंग, दिनेश चोखारे, संगीता अमृतकर, रजनीताई हजारे यांनीही मार्गदर्शन केले.आता काँगेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र येण्याची वेळ आहे. गावागावातील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले पाहिजे, असेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रास्ताविक अॅड. प्रमोद आनंद यांनी केले. संंचालन प्राचार्य नरेंद्र बोबडे तर आभार एनएसयुआय अध्यक्ष कृणाल चहारे यांनी मानले. कार्यक्रमाला चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, सावली, वरोरा, चिमूर, राजुरा, जिवती, कोरपना, पोंभूर्णा इत्यादी तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
विकास करण्याची मागणी
पेंढरी (कोके) : गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या त्रिसुत्रीचा समावेश केला जातो. परंतु मागील काही वर्षांपासून एकही विकासकामे मार्गी न लागल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.