दहा हजार प्रकरणांचा निपटारा करण्यास न्यायालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 05:00 AM2021-12-11T05:00:00+5:302021-12-11T05:00:40+5:30

झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली.

The court moved to settle tens of thousands of cases | दहा हजार प्रकरणांचा निपटारा करण्यास न्यायालय सरसावले

दहा हजार प्रकरणांचा निपटारा करण्यास न्यायालय सरसावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो. सर्वांनाच जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने वाद टाळले जातात. त्यासाठीच शनिवार, दि.१० हजारांपेक्षा अधिक प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत. सोप्या प्रक्रियेतून प्रकरणे निकाली काढून फायदे मिळविण्याची ही मोफत नामी संधी पक्षकारांना उपलब्ध झाली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.
झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने समक्ष निकाल लावला जातो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्त्व असते व  अंमलबजावणीही करता येते. त्यामुळे वेळ, पैसा व श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा सामोपचाराने निपटारा होतो, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समित्यांनी दिली. नागरिकांना आपली प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे समक्ष येऊन किंवा ०७१७२-२७१६७९ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
 लाेकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे  
चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुका न्यायालयात एकाच दिवशी होणाऱ्या लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी, कलम १३८ एन.आय. ॲक्ट (धनादेश न वटणे) वित्त संस्था, बँक कर्जवसुली, वाहन अपघात भरपाई, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक-भाडेकरू व कौटुंबिक वाद, वीज ॲक्टचे समझोता योग्य वाद, वाहन हायर परचेस व न्यायालयात येण्याअगोदरची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे, पाणीपट्टी व वीजबिल आपसी समझोतासाठी ठेवण्यात येणार आहे. 

शनिवार होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल व दाखलपूर्व अशा १० हजारांहून अधिक केसेस सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवली जात आहेत. या अदालतीत विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
- कविता अग्रवाल,  
मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर

 

Web Title: The court moved to settle tens of thousands of cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.