न्यायालयातून घटनाप्रेरित न्यायदान व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 10:53 PM2018-06-23T22:53:27+5:302018-06-23T22:53:49+5:30

भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे.

Court should be sentenced to be prosecuted | न्यायालयातून घटनाप्रेरित न्यायदान व्हावे

न्यायालयातून घटनाप्रेरित न्यायदान व्हावे

Next
ठळक मुद्देभूषण गवई : कोरपना येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : भारतीय राज्यघटनेने सर्व स्तरातील घटकांना समान न्याय व हक्क दिले आहेत. त्याचा प्रत्येकांना समान लाभ व्हावा आणि जलदगतीने न्याय मिळावा यादृष्टीने येथे न्यायलयाची उभारणी करण्यात आली आहे. या न्यायलयाद्वारे राज्यघटनेला अभिप्रेत असे निष्पक्ष न्यायदान व्हावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. कोरपना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश नितीन बोरकर, दिवाणी न्यायधीश डी. व्ही. सूर्यवंशी, पालक न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती चांदुरकर म्हणाले, न्यायपालिका या समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत समान न्याय मिळावा, यासाठी कार्यरत असते. त्यामुळे प्रत्येकाला न्याय मिळावा, यासाठी प्रत्येकांनी न्यायविषयक दाद मागितली पाहिजे, हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे.
न्यायमूर्ती गिरटकर म्हणाले, कोरपना येथे न्यायालय सुरु झाल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर झाली आहे.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कोरपना तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. वा. व्ही. वासेकर, संचलन दिवाणी न्यायधीश हरणे तर आभार दिवाणी न्यायधीश कुलकर्णी यांनी मानले.

Web Title: Court should be sentenced to be prosecuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.