कोविड केअर सेंटर्संना करावे लागणार अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:00 AM2021-03-20T05:00:00+5:302021-03-20T05:00:38+5:30
एसीएचसीमध्ये चंद्रपुरातील चार खासगी हॉस्पिटल्स व चंद्रपूर येथील क्राईस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल तसेच ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलचा समावेश आहे. खासगी हॉस्पिटल्स स्वत:कडील उपलब्ध खाटांच्या क्षमतेनुसार रूग्णांना भरती करून घेऊ शकतात. मात्र, चंद्रपूर वन अकादमी, वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती येथील कोविड केअर सेंटर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांना लवकरच अपडेट करावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर सुमारे १ हजार २०० आणि अॅन्टिजेनच्या १ हजार ५०० चाचण्या केल्या जात आहे. जानेवारी-फेब्रुवारीच्या तुलनेत ही संख्या मोठी असली तरी चाचण्यांची संख्या पुन्हा वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यामुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढणार असून चारही कोविड केअर सेंटर्सला तातडीने अपडेट करावे लागणार आहे.
कोविड १९ चाचणी करण्यासाठी शासनाने चाचण्यांचे दोन प्रकार मान्य केले. चाचणी केल्यानंतर बाधित आढल्यास त्यांच्या उपचाराकरिता डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच), डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि डेडीकेटेड कोविड केअर सेंटर (डीसीसीसी) अशी चार वर्गीकरणातील आरोग्य संस्थांची निर्मिती केली.
एसीएचसीमध्ये चंद्रपुरातील चार खासगी हॉस्पिटल्स व चंद्रपूर येथील क्राईस्ट चॅरिटेबल हॉस्पिटल तसेच ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलचा समावेश आहे. खासगी हॉस्पिटल्स स्वत:कडील उपलब्ध खाटांच्या क्षमतेनुसार रूग्णांना भरती करून घेऊ शकतात. मात्र, चंद्रपूर वन अकादमी, वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती येथील कोविड केअर सेंटर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांना लवकरच अपडेट करावे लागणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
तर बेड्स अपुरे पडू शकतात
नोव्हेंबर २०२० मध्ये रूग्ण संख्या घटल्याने कोविड केअर सेंटरमधील स्थायी कर्मचाऱ्यांना मूळ पदावर हलविण्यात आले. अस्थायी कर्मचाऱ्यांना कमी केले. सध्या या केंद्रात २२८ बाधित उपचार घेत आहेत. रूग्णवाढीची तीव्रता अशीच कायम राहिली तर येत्या काही दिवसातच उपलब्ध बेड्सही अपुरे पडू शकतात. याची उपाययोजना आधीच करणे गरजेचे आहे.
दहा रूग्णांवरून पोहोचले हजारावर!
चार कोविड केअर सेंटरमध्ये ७५० बेड्स आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या दहावर होती. त्यामुळे कोरोना केअर सेंटरर्सच्या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले. जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्यातच रूग्णांची संख्या एक हजार ११ वर पोहोचली आहे.