विनाकारण फिरणाऱ्या २९० जणांची कोविड तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:29+5:302021-05-12T04:29:29+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट आहे. मात्र, काही व्यक्ती ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले. बंदच्या काळात अत्यावश्यक बाबींना सूट आहे. मात्र, काही व्यक्ती याचा फायदा घेत विनाकारण घराबाहेर निघत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू केली. चंद्रपूर ग्रामीण क्षेत्र, बल्लारपूर, राजुरा व चिमूर तालुकास्थळी मंगळवारी कारवाई झाली. घुग्घुस ५७ व पडोली येथे ६७ जणांची चाचणी झाली.
बल्लारपुरात सकाळी ८८ जणांची तपासणी केली असता पाचजण अहवाल पॉझिटिव्ह आढळले. राजुरा शहरात पंचायत समिती चौकात २८ जणांची झाली. चिमूर शहरात ५० नागरिकांची तपासणी झाली. त्यापैकी दोघे पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आढळलेल्या सातही जणांना कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. कुणीही व्यक्ती विनाकारण फिरताना आढळल्यास रस्त्यावरच अॅन्टिजन तपासणी केली जात आहे. त्यामुळे लक्षण नसलेले रूग्ण शोधण्यास मदत मिळत आहे.