कोविड पॉझिटिव्हीटी दर घसरला, १८७ नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:21+5:302021-05-29T04:22:21+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८२ हजार १९७ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७६ हजार ९८९ ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८२ हजार १९७ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७६ हजार ९८९ झाली आहे. सध्या ३ हजार ७७८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ४ लाख ६६ हजार ६४३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ८१ हजार ४३८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १४३० बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३२६, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३७, यवतमाळ ४८, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
मृतांची संख्येतही होऊ लागली घट
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील साईबाबा वार्ड, सिव्हील लाईन परिसरातील ४८ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरूष, मित्र नगर परिसरातील ६८ वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील ५३ वर्षीय पुरूष, मूल तालुक्यातील ५५ वर्षीय पुरूष, कोरपना तालुक्यातील ३३ वर्षीय पुरूष तर ब्रह्मपुरी तालुक्यातील ५० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
असे आहेत पॉझिटिव्ह
चंद्रपूर मनपा क्षेत्र ४७
चंद्रपूर तालुका १०
बल्लारपूर ३९
भद्रावती १५
ब्रह्मपुरी १५
नागभिड ०६
सिंदेवाही ०१
मूल ०२
सावली ००
पोंभूर्णा ०१
गोंडपिपरी ०१
राजूरा १६
चिमूर ०३
वरोरा १८
कोरपना ०७
जिवती ००
इतर ०६