कोविड लसिकरण जनजागृती व्हॅन चंद्रपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:52+5:302021-05-03T04:22:52+5:30

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक ...

Covid vaccination awareness van filed in Chandrapur | कोविड लसिकरण जनजागृती व्हॅन चंद्रपुरात दाखल

कोविड लसिकरण जनजागृती व्हॅन चंद्रपुरात दाखल

Next

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग, महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात १६ व्हॅन्सद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शन आयोजित करून तसेच कलापथकांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड-१९ लसीकरण मोहीम आणि आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दल जनजागृती निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, नागपूरच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये २० दिवस व्हॅनद्वारे फिरते बहुमाध्यमी प्रदर्शनाच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत लसीकरणाबाबतची माहिती, आत्मनिर्भर भारत अंतर्गत विविध उपक्रम आणि कोविड-१९ विषयक नियमांबाबतची माहिती जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहचविणे, हा या मागील उद्देश आहे.

या मोहिमेच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणेचे संचालक प्रकाश मकदुम यांच्या मार्गदर्शनात सहायक संचालक निखिल देशमुख, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, तकनिकी सहायक संजय तिवारी, संजीवनी निमखेडकर,जी नरेश आणि सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर, श्रीकृष्ण बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ, नवचैतन्य बहुउद्देशीय संस्था परिश्रम घेत आहेत.

Web Title: Covid vaccination awareness van filed in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.