चित्ररथाद्वारे कोविड लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:24+5:302021-07-08T04:19:24+5:30
यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. ...
यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, कोविड लसीकरणाबाबत जनतेत असलेले गैरसमज दूर करून प्रबोधन करणे आवश्यक आहे. नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी संबंधित तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय समित्यांनी सक्रिय व्हावे. स्थानिक लोकप्रतिनिधी व लसीकरण झालेल्या मान्यवरांची मदत घेऊन लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे. लसीकरणाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समजावून सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून लसीकरण जनजागृती पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. या मोहिमेदरम्यान चित्ररथ, पोस्टर्स, स्टिकरशीट, जिंगल्स, हँडबिलच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.