संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी ‘ॲक्शन प्लान’ तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:02+5:302021-06-02T04:22:02+5:30

यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियंका पवार-कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, ...

Create an ‘Action Plan’ to prevent a possible third wave | संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी ‘ॲक्शन प्लान’ तयार करा

संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी ‘ॲक्शन प्लान’ तयार करा

Next

यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रियंका पवार-कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम उपस्थित होते.

तिसरी लाट थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्व तालुक्यांचा आढावा घेऊन नियोजन करीत आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, सार्वत्रिक निवडणूक किंवा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्याकरिता ज्याप्रकारे ॲक्शन प्लॉन तयार केला जातो, त्याच धर्तीवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा ॲक्शन प्लान तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याने इत्थंभूत माहिती आतापासून तयार करावी. यात आपापल्या तालुक्यातील खासगी रुग्णालयांची संख्या, तज्ज्ञ डॉक्टरांची यादी, विलगीकरणासाठी लागणाऱ्या शासकीय इमारती, खासगी सभागृहे, मंगल कार्यालये, आतापर्यंत खासगी उद्योगांनी कोविडमध्ये केलेली मदत, कोविड केअर सेंटर, डेडिकेडेट कोविड हेल्थ उभारण्यासाठी जागांचा शोध आदींचा समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे टेस्टिंग होणे गरजेचे आहे. यात आयएलआय व सारीच्या रुग्णांची टेस्टिंग, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो-रिस्क काॅन्टॅक्ट, सुपर स्प्रेडर, नरेगाच्या बांधकामावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मजूर, गोसेखुर्दच्या बांधकाम साइड्स, विविध तालुक्यात असलेल्या मोठमोठ्या कंपन्यातील मजूरवर्ग यांचा समावेश असावा. तसेच नियमांचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्यांची टेस्टिंग व्हायलाच पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिल्या.

प्रत्येक तालुक्यात जागृती

स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनामार्फत गावस्तरावर लसीकरण आणि सर्व्हेक्षण समितीचे नियोजन करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला व्हिसीच्या माध्यमातून सर्व तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी (न.प), गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आदी उपस्थित होते.

लसीकरणाच्या अफवांना बळी पडू नका

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये लसीकरण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. शास्त्रज्ञांनी तयार केलेली लस ही अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी स्वत:हून समोर यावे. तिसरी लाट थोपविण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनी तीन महिन्यांनी लस घ्यावी. स्तनदा मातांसाठीसुद्धा लस अतिशय सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी संबंधित व्यक्ती रक्तदान करू शकतात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

Web Title: Create an ‘Action Plan’ to prevent a possible third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.