गावागावात स्वच्छतागृह तयार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:23 PM2018-11-03T22:23:56+5:302018-11-03T22:24:15+5:30
पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था (वासो), पाणी व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबईचे संचालक राहुल साकोरे यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्या आले असताना त्यांनी जिल्हा परिषदेतील कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील शाश्वत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावात स्वच्छतागृह तयार करा, असे निर्देश राहुल साकोरे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था (वासो), पाणी व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबईचे संचालक राहुल साकोरे यांनी नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्या आले असताना त्यांनी जिल्हा परिषदेतील कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील शाश्वत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावात स्वच्छतागृह तयार करा, असे निर्देश राहुल साकोरे यांनी दिले.
पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था (वासो), पाणी व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबईचे संचालक राहुल साकोरे शनिवारी चंद्रपुरात आले होते. जिल्ह्यातील अनेक कामांची माहिती त्यांनी जाणून घेतली. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात कामाचा सखोल आढावा घेण्यात आला. या आढावा सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनीसुद्धा उपस्थितांचा आढावा घेतला. आढवा सभेत संचालक राहुल साकोरे यांनी कामाविषयी बरेच निर्देश दिलेले आहे. प्रत्येक तालुक्याची माहिती व सूचनेसंदर्भात आदानप्रदाना करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करा, पाणी गुणवत्ता विषय सर्वांनी गाभिर्यांने घेऊन काम करा, शाश्वत स्वच्छता आराखड्याची कामे वेळेत पुर्ण करा, नादुरुस्त शौचालय दुरुस्तीचे नियोजन करुन दर दिवशी आढावा घ्या, स्वच्छ भारत कोषचा निधी वेळेत वितरित करा, गावातील कोणीही उघड्यावर शौचास जाणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी गावस्तरावर वातावरण निर्माण करा.
या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या व तालुक्यांच्या कामात येत असलेल्या अडचणीसुध्दा ऐकून त्यावर उपाययोजना सूचविण्यात आल्या. सर्व अधिकारी कर्मचारी यांनी समन्वयातून नियोजन बध्द कामे पुर्ण करण्यावर भर द्यावा, असा मौलिक सल्लासुध्दा उपस्थितांना दिला. या आढावा सभेला जिल्हा स्तरावरील सर्व सल्लागार, पंचायत समितीस्तरावरील विस्तार अधिकारी (पंचायत), गट समन्वयक, समूह समन्वयक, भूजल यंत्रणेचे अधिकारी व इतर विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.