सांडपाणी व्यवस्थापनासाठी गावात शोषखड्डे निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:08+5:302021-09-26T04:30:08+5:30
चंद्रपूर जिल्ह्यास ४० हजार शोषखड्डे निर्मितीचे उद्दिष्ट असताना, नरेगा योजना व लोकसहभागातून उद्दिष्टापेक्षा जास्त शोषखड्डे प्रत्येक गावात निर्माण करा. ...
चंद्रपूर जिल्ह्यास ४० हजार शोषखड्डे निर्मितीचे उद्दिष्ट असताना, नरेगा योजना व लोकसहभागातून उद्दिष्टापेक्षा जास्त शोषखड्डे प्रत्येक गावात निर्माण करा. यासाठी प्रत्येक गावाचा १०० दिवसाचा कृती आराखडा निर्माण करा, त्यानुसार नियोजनबध्द कामे करा. या कामात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांचा सहभाग मोलाचा असुन प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यातील सर्व सरपंच यांच्याशी ऑनलाईन झुम मिटिंगद्वारा जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी संवाद साधला.
सरपंच स्वच्छ्ता संवाद उपक्रमाला जिल्ह्यातील सरपंच यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील बहुसंख्य सरपंचांनी या ऑनलाईन उपक्रमात सहभाग घेतला होता. तालुका पातळीवरुन पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी व अन्य मान्यवरांनी जिल्ह्यातील उपक्रमात सहभागी सर्वांना महत्वाचे मार्गदर्शन केले. जिल्हा पातळीवरुन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरुनुले यांनी उपस्थित सर्व सरपंच यांना मार्गदर्शन केले. सदर उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, प्रवीण खंडारे व सुनील चिकटे यांनी अथक परिश्रम घेतले.