शहर व गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांचे गट तयार करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:28 PM2018-07-27T22:28:11+5:302018-07-27T22:29:09+5:30

शहर व गावात खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण करायची असेल तर, प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने विविध शाश्वत उपक्रम राबविण्यासाठी युवक व युवतींनी गट निर्माण करून सक्रिय कार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जयश्रीया क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

Create a group of youth for the cleanliness of the city and village | शहर व गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांचे गट तयार करावे

शहर व गावाच्या स्वच्छतेसाठी युवकांचे गट तयार करावे

Next
ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : स्वच्छता सर्वेक्षण कार्यशाळा
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहर व गावात खऱ्या अर्थाने स्वच्छता निर्माण करायची असेल तर, प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने विविध शाश्वत उपक्रम राबविण्यासाठी युवक व युवतींनी गट निर्माण करून सक्रिय कार्यासाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. जयश्रीया क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओमप्रकाश यादव, उपक्रमाचे राज्य समन्वयक महेश कोडगीरे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा शाश्वत स्वच्छता आराखडा निर्मिती व स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण या विषयातील विविध पैलुंविषयी विचारमंथन करण्यात आले. आराखड्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी चार पथक गठित करण्याचा निर्णयही योवळी घेण्यात आला़याशिवाय उपस्थितांच्या सुचनांना आराखड्यात स्थान देण्यात आले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण २०१८ ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी करण्यासाठी पीपीटीद्वारे सादरीकरण झाले़ मुख्य कार्यकारी अधिकारी पापळकर म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रोत्साहन दिल्यास उपक्रमात सहजपणे सहभागी होतात़
याकरिता विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट व युवक मंडळ व लोकप्रतिनिधींनी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सर्वेक्षणाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली़ जिल्हा स्वच्छता सर्वेक्षणात अधिकाधिक गुण कसे प्राप्त करता येईल, याविषयीही मार्गदर्शन केले.
दीर्घकालिन धोरण निश्चित करणार
जि़ प़ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे म्हणाले, स्वच्छता सर्वेक्षण ग्रामीण ही मोहीम यशस्वी करायची असेल तर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी लोकसहभागाकडे लक्ष द्यावे़ जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व सल्लागारांनी या मोहिमेत सहभागी होऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले़ या कार्यशाळेच्या माध्यमातून शहर व सर्व गावे शाश्वत स्वच्छ करण्याची दिशा मिळाली़ याविषयीचे धोरण निश्चित करण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे़ दोन दिवशीय कार्यशाळेला जिल्ह्यातील ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी, बीआरसी,गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Create a group of youth for the cleanliness of the city and village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.