सृजनशील शिक्षकच तरुणपिढी घडवितो

By Admin | Published: January 21, 2017 12:41 AM2017-01-21T00:41:09+5:302017-01-21T00:41:09+5:30

मास्तरच खर्रा खात असतील तर विद्यार्थी काय करतील, या वाक्यापासून सुरूवात करीत माणसात आणि जनावरात फरक असून जनावराना शिक्षण नसते.

Creative teacher builds young people | सृजनशील शिक्षकच तरुणपिढी घडवितो

सृजनशील शिक्षकच तरुणपिढी घडवितो

googlenewsNext

मकरंद अनासपुरे : भेजगाव येथे शाळेच्या रौप्य महोत्सवाला उपस्थिती
शशिकांत गणवीर भेजगाव
मास्तरच खर्रा खात असतील तर विद्यार्थी काय करतील, या वाक्यापासून सुरूवात करीत माणसात आणि जनावरात फरक असून जनावराना शिक्षण नसते. तर माणसांना शिक्षण मिळते. माणसांनी शिक्षणाच्या भरोशावर चमत्कारिक प्रगती साधली आहे. पूर्वी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता, असे म्हणायचे. आता विडी, सिगारेडचा धूर निघतो, असे सांगत विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहावे. बालवयात विद्यार्थ्यांवर आपण संस्कार करू तसे ते घडतात. सृजनशील शिक्षकच तरूण पिढी घडवित असल्याचे आवाहन मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
मूल तालुक्यातील भेजगाव येथील शरदचंद्र पवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात अनासपुरे उद्घाटक म्हणून बोलत होते. रौप्य महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल तर विशेष अतिथी म्हणून ‘आमचे गाव, आमचे राज्य’चे प्रणेते देवाजी तोफा, सरपंच रज्जूताई त. शेंडे, माजी सभापती प्रकाश गांगरेड्डीवार तर सत्कारमुर्ती म्हणून संस्थापक प्रभाकर गाडेवार, प्रेमिला गाडेवार, प्राचार्य चंद्रमौली आदी मंचावर उपस्थित होते.
अनासपुरे पुढे म्हणाले की, रील हिरोपेक्षा रियल हिरोची ओळख विद्यार्थ्यांना करून दिल्यास सामाजिक परिवर्तनासाठी युवा पिढी समोर येईल व यातून सामाजिक विकास साधता येतो. आपले राष्ट्रसंताची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक महात्मांच्या पदस्पर्श या भुमिला लाभला असून बाबा आमटे, अभय बंग यासारख्या महान रियल हिरोची ओळख विद्यार्थ्याना होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
तर देवाजी लोका यांनी देश स्वातंत्र्य झाला तेव्हा गाव मात्र गुलाम झाले. आपण खरच स्वतंत्र झालो का. हा विचार मंथनाचा भाग असून स्वातंत्र्यपुर्व काळात लोक गावात राहत. जल जंगम, ग्रामीण त्यांचे होते. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जल, जंगल जमिन या सरकारच्या झाल्या आणि गाव मात्र भिकारी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन विनोद मानापुरे, प्रास्ताविक वा.ल. कोटगले तर आभार प्रशांत गाडेवार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थ्यांनो आळशी होऊ नका. ज्ञानी मामसात सुसंवाद होतो. एक ज्ञानी एक अज्ञानी असल्यास त्यांच्यात असंवाद होतो. तर दोन्ही अडाणी असल्यास त्यांच्यात मारामारी होते. त्यामुळे प्रत्येकांनी साक्षर बना. साक्षराविरूद्ध राक्षता बनू नका.

Web Title: Creative teacher builds young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.