कचऱ्याला कल्पकतेचा स्पर्श; प्लास्टिक पिलरने बनविली उद्यानाची सुरक्षा सीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 11:49 AM2021-12-08T11:49:29+5:302021-12-08T11:50:21+5:30

बगिच्यातील टायरच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू आकर्षणाचा विषय ठरत आहे. प्लास्टिक पिलरचा उपयोग करून उद्यानाची सुरक्षा सीमा तयार करण्यात आली आहे व ऑइलसुद्धा जनरेट करण्यात येत आहे.

the creativity through solid waste management in a garden in bhadravati | कचऱ्याला कल्पकतेचा स्पर्श; प्लास्टिक पिलरने बनविली उद्यानाची सुरक्षा सीमा

कचऱ्याला कल्पकतेचा स्पर्श; प्लास्टिक पिलरने बनविली उद्यानाची सुरक्षा सीमा

Next

चंद्रपूर : कचरा समोर दिसला की मनात एक प्रकारची घृणा निर्माण होते. पण याच कचऱ्याला जर कल्पकतेचा स्पर्श झाला तर तो कुतूहलाचा विषय बनतो. त्यानंतर टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मितीसुद्धा होते. 

भद्रावती देऊळवाडा रोडवर स्थित नगर परिषद भद्रावतीच्या घनकचरा प्रकल्पाला अगदी वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. या प्रकल्पात संकलित टायर व प्लास्टिकद्वारे विविध शोभिवंत व टिकाऊ वस्तू तयार करण्यात आलेल्या आहे. एवढेच काय तर प्लास्टिक पिलरचा उपयोग करून उद्यानाची सुरक्षा सीमा तयार करण्यात आली आहे व ऑइलसुद्धा जनरेट करण्यात येत आहे. या उपक्रमामुळेच नुकताच भद्रावती नगरपालिकेला नावीन्यपूर्ण उपक्रम व चांगल्या सवयी उपक्रमासाठी सर्वोत्कृष्ट शहराचा पुरस्कार प्राप्त झाला.

या ठिकाणच्या बगिच्यात टायरच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले मोर, घुबड, पोपट, कोंबडे, शहामृग हे पक्षी व खुर्ची, टेबल, घोड्याचा टांगा, बुलेट गाडी या वस्तू आकर्षणाचा विषय ठरत आहे. टायरला कापून त्याला वेगळे आकार देऊन ग्रेंडर मशीनद्वारे कापण्यात येऊन या वस्तूंना आकार देण्यात आलेला आहे.

यासोबतच टाकाऊ प्लास्टिकपासून टेबल, कुंडी, नाली चेंबर, वीट, कवेलू, पेवर ब्लॉक, प्लास्टिक पिलर इत्यादी व शोभिवंत वस्तू तयार करण्यात आल्या असून सोफासेट, डायनिंग टेबल हेसुद्धा तयार करण्यात येणार असल्याचे राजू भगत व निखिल लोहकरे यांनी सांगितले. याला मशिनरीचा खर्च सोडल्यास कोणताही खर्च लागत नसल्याचेही ते म्हणाले.

घनकचरा प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत व गांडूळ खत तयार करण्यात येते. तसेच एफएसटीपीद्वारा सांडपाण्यातून सोनखत तयार होत असल्याची माहिती अनिल धानोरकर व मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांनी दिली. तसेच फळझाडे व भाजीपाला लावण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: the creativity through solid waste management in a garden in bhadravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.