वाणिज्य शाखेतील पदविधर बनला ‘ई रिक्षा’ चा निर्माता

By admin | Published: September 25, 2015 01:32 AM2015-09-25T01:32:17+5:302015-09-25T01:32:17+5:30

विज्ञान शाखेत वावरताना विद्यार्थी नवनविन तंत्रज्ञान विकसीत करताना दिसतात. मात्र चंद्रपूरच्या एका ध्येयवेड्या विश्वास मादमशेट्टीवार ...

The creator of e-rickshaw became a graduate in the commerce school | वाणिज्य शाखेतील पदविधर बनला ‘ई रिक्षा’ चा निर्माता

वाणिज्य शाखेतील पदविधर बनला ‘ई रिक्षा’ चा निर्माता

Next

इको फ्रेंडली रिक्षा : पेट्रोल ऐवजी बॅटरीचा आधार
राजू गेडाम मूल
विज्ञान शाखेत वावरताना विद्यार्थी नवनविन तंत्रज्ञान विकसीत करताना दिसतात. मात्र चंद्रपूरच्या एका ध्येयवेड्या विश्वास मादमशेट्टीवार यांनी चक्क बॅटरीवर चालणारा ‘ई रिक्षा’ बनविल्याने सर्वत्र कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर रिक्षा इको फ्रेंडली असून प्रदूषण विरहित आहे व बॅटरीचा खर्च स्वस्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणारा असल्याचे दिसून येते.
चंद्रपूर येथील इलेक्ट्रीक इंडस्ट्रीज परिसरात राहणारा विश्वास गजानन मादमशेट्टीवार यांचे मोठे भाऊ एका कंपनीत कार्यरत आहेत. वडील गजाननराव देखील विज्ञान शाखेतील असल्याने विज्ञानाचे तंत्र घरी विकसीत आहे. मात्र विश्वास यांनी वाणिज्य शाखेकडे वळले. वाणिज्य शाखेची पदवी घेत असताना वडील, भाऊ यांच्या चालणाऱ्या घडामोडीवर त्याचे सूक्ष्मपणे निरीक्षक असायचे. या निरीक्षणातून त्यांनी ‘ई रिक्षा’ बनविण्याचा निर्णय घेतला. प्रथमत: चेचीस बनविण्यात आली. यात वडील व भावाचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर लोखंडी रॉडचा ढाचा बनविला. यात त्यांनी दोन प्रकारचे ‘ई रिक्षा’ बनविले. यात मालवाहक व प्रवासी वाहक याचा समावेश आहे. मालवाहक व प्रवासी वाहक यांना लागणारी बॅटरी सारख्या किंमतीची असून चार बॅटऱ्यांची किंमत २५ हजार रुपये आहे. दर सहा महिन्यांनी या बॅटऱ्या बदलाव्या लागतात. ताशी २० किमी चालणारा हा ‘ई रिक्षा’ एकदा चार्ज झाल्यावर ८० ते १०० किमीपर्यंत चालु शकतो. प्रदूषण विरहित असलेल्या या ‘ई रिक्षा’ मुळे सर्वसामान्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. इतर रिक्षा प्रमाणे आवाज न करता संथपणे चालणारा हा रिक्षा सर्वांना प्रेरणादायी ठरणार असून ते मूल येथील पडगेलवार यांच्याकडे रिक्षा घेऊन आल्यानंतर ही माहिती दिली.

Web Title: The creator of e-rickshaw became a graduate in the commerce school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.