वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:03+5:302021-02-16T04:30:03+5:30

वीज ग्राहक मुक्ताबाई मुसणे यांच्या मीटरवरून आरोपी फुलमारे याच्या घरी वीजवापर सुरू होता. घटनेच्या एक दिवसाआधीच तंत्रज्ञ चापले यांनी ...

Crime against the person who beat the power worker | वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

वीज ग्राहक मुक्ताबाई मुसणे यांच्या मीटरवरून आरोपी फुलमारे याच्या घरी वीजवापर सुरू होता. घटनेच्या एक दिवसाआधीच तंत्रज्ञ चापले यांनी साईनाथ फुलमारे यांना दूरध्वनी करून वीज बिल भरले किंवा नाही, अशी विचारणा केली. दरम्यान, बोलत असतानाच मला जास्तीचे बिल आल्याचे सांगून मोबाईलवर बोलणे कट केले. दुसऱ्या दिवशी बिल भरल्याची पावती दाखवा, अशी विचारणा केली असता ग्राहकाने प्रतिसाद न दिल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, वस्तुस्थिती जाणून न घेता फुलमारे याने वीज कर्मचारी चापले यांच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यात ते गंभीर जखमी झाले. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंवि ३३२, ३५३ व ५०४ अन्वये धाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against the person who beat the power worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.