कोरोनातही गुन्हेगारीचा आलेख वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:26+5:302021-04-30T04:36:26+5:30

चंद्रपूर : मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. संचारबंदी, लॉकडाऊन असल्याने चौका-चौकांत दिवसरात्र पोलिसांचा पहारा सुरू आहे. मात्र, ...

As the crime graph in Corona grows | कोरोनातही गुन्हेगारीचा आलेख वाढताच

कोरोनातही गुन्हेगारीचा आलेख वाढताच

Next

चंद्रपूर : मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. संचारबंदी, लॉकडाऊन असल्याने चौका-चौकांत दिवसरात्र पोलिसांचा पहारा सुरू आहे. मात्र, तरीसुद्धा गुन्हेगारच पोलिसांना वरचढ ठरत असून जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख वाढताच असल्याचे दैनंदिन गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर निर्बंध होते. चौकाचौकांत पोलिसांचा ताफा होता. प्रत्येकाची सखोल चौकशी करून त्याला सोडण्यात येत होते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्याचे चित्र उलट दिसून येत आहे.

सन २०१९ मध्ये ७६४ चोरीच्या घटना घडल्या होत्या, तर २०२० मध्ये लॉकडाऊन असल्याने सर्व कुटुंब एकत्रित होते. बाहेर पोलिसांचा पहार होता. तरीसुद्धा ७१३ चोरीच्या घटना घडल्या, तर २०२१ मध्ये मार्च महिन्यापर्यंतच १७४ चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली. यासोबतच डकेतीच्या घटनाचीसुद्धा नोंद करण्यात आली. २०१९ मध्ये ५ डकेतीची नोंद होती, तर २०२० मध्ये दोन, तर २०२१ मध्ये केवळ मार्च महिन्यापर्यंत दोन डकेतीच्या गुन्ह्याच्या नोंद झाली. यासोबतच इतर गुन्ह्यांबाबतही असा प्रकार दिसून येतो. पोलिसांचा संपूर्ण ताफा हा कोरोनाच्या बंदोबस्तात गुंतले असल्याने वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष तर झाले नसावे ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक्स

तीन महिन्यांत ३२ बलात्कार ६१ विनयभंग

लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. सर्वांचेच घराबाहेर पडणे बंद आहे; परंतु महिला व मुलींवरील अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. २०१९ मध्ये बलात्कारांच्या ९५, तर विनयभंगाच्या २२७ घटनांची नोंद करण्यात आली. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही यामध्ये बरीच वाढ होऊन ११५ बलात्कार, २५० विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली, तर सन २०२१ मध्ये मार्च महिन्यापर्यंत ३१ बलात्कार, तर ६१ विनयभंग झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

१२ खुनाच्या घटना

मागील दोन वर्षाच्या आकडेवारीचा विचार केल्यास जिल्ह्यात हत्येच्या घटना वाढतच आहेत. यामध्ये सराईत गुन्हेगाराच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत, तर काही अवैध धंद्याच्या भांडणातून हत्येच्या घटना घडल्या आहेत. २०१९ मध्ये ३३ खून, २०२० मध्ये ५४, तर मार्च २०२१ मार्च महिन्यापर्यंत १२ खुनाच्या घटना, तर पाच खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्या आहेत.

कोट

Web Title: As the crime graph in Corona grows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.