पोलिसांच्या मोबाईलमध्ये आता गुन्हेगारांची कुंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 06:00 AM2019-11-27T06:00:00+5:302019-11-27T06:00:41+5:30

एखाद्या गुन्ह्यात कोणताही आरोपी पकडल्यास त्यांच्यावर अन्य जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत का, याबाबतची संपूर्ण हिस्ट्री शोधून काढणे अत्यंत कठीण काम होते. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाच्या संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी यायच्या. मात्र, आता पोलिसांसाठी तयार केलेल्या ‘कोर्ट चेकर’ या अप्लिकेशनमुळे पोलिसांची या कटकटीपासून मुक्ती झाली आहे.

The criminals now ring in police mobiles | पोलिसांच्या मोबाईलमध्ये आता गुन्हेगारांची कुंडली

पोलिसांच्या मोबाईलमध्ये आता गुन्हेगारांची कुंडली

Next
ठळक मुद्देकोर्ट चेकर अ‍ॅप : पोलिसांना कर्तव्य बजावणे झाले सोपे

परिमल डोहणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गुन्हेगारांचा रेकार्ड सांभाळणे पोलिसांच्या डोईजड होत असते. मात्र आता या कटकटीपासून पोलिसांना मुक्ती मिळाली असून सर्व रेकार्ड पोलिसांच्या मोबाईलमध्येच डाऊनलोड करणे शक्य झाले आहे. पोलिसांसाठी नुकतेच ‘कोर्ट चेकर’ नावाचे अप्लिकेशन तयार करण्यात आले. या अ‍ॅपमुळे राज्यातील कोणत्याही गुन्हेगारांची माहिती त्यासोबतच गुन्हेगाराचा न्यायालयात सुरू असलेला खटला आणि तारखांचीही माहिती मिळणार असल्याने पोलिसांची डोकेदुखी कमी झाली आहे.
एखाद्या गुन्ह्यात कोणताही आरोपी पकडल्यास त्यांच्यावर अन्य जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत का, याबाबतची संपूर्ण हिस्ट्री शोधून काढणे अत्यंत कठीण काम होते. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाच्या संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी यायच्या. मात्र, आता पोलिसांसाठी तयार केलेल्या ‘कोर्ट चेकर’ या अप्लिकेशनमुळे पोलिसांची या कटकटीपासून मुक्ती झाली आहे. ‘टष्ट्वेंटी फोर बाय सेवन’ या साईटवरून पोलिसांना सदर अ‍ॅप डाऊनलोड करता येतो. त्यानंतर युजर आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर मोबाईल किंवा संगणकामध्ये वापर करणे सहज शक्य होते.

केवळ पोलिसांनाच करता येणार अ‍ॅपचा वापर
सदर अप्लिकेशन तयार करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. सदर अप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्याची खातरजमा केली जाते. सदर व्यक्ती पोलीस विभागात असेल तरच त्याला युजरआईडी मिळतो. विशेष म्हणजे आॅनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय या अ‍ॅपचा वापर करता येत नाही.

आयसीजेएस प्रणालीनंतरचा दुसरा प्रयोग
देशातील कोणत्याही आरोपीची संपूर्ण पार्श्वभूमी पोलिसांना त्वरीत मिळावी, यासाठी यापूर्वी सीसीटीएनएस आॅनलाईन प्रणालीतर्फे आयसीजेएस यंत्रणा सुरू झाली आहे. त्यानंतरचा ‘कोट चेकर’ हा दुसरा प्रकार आहे. आयसीजेएस प्रणालीेमध्ये संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आली. या यंत्रणेद्वारेही पोलिसांना आरोपीची सर्वच माहिती मिळते, अशी माहिती पोलीस विभागाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अप्लिकेशनद्वारे छायाचित्रांसह मिळणारी माहिती
न्यायालयाची तारीख असल्यास पोलिसांना आरोपींना घेऊन न्यायालयात जावे लागते. या अप्लिकेशनमुळे पोलिसांना आरोपीची न्यायालयात हजर होण्याची तारीख, आरोपीवरील गुन्हे, सुनावणीची तारीख, न्यायालयाचा आदेश आणि आरोपीच्या छायाचित्रासह अन्य माहिती मिळत असते.

गुन्हेगारांची हिस्ट्री जाणून त्यादृष्टीने तपास करण्यासाठी हे अ‍ॅप अत्यंत उपयोगी आहे. गुन्ह्यांचा तपास करून आरोपीला अट करणे आता सहज शक्य झाले. अ‍ॅपचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व ठाण्यांमध्ये वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
-डॉ. महेश्वर रेड्डी,
पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Web Title: The criminals now ring in police mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस