धान उत्पादक शेतकºयांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:49 AM2017-11-01T00:49:05+5:302017-11-01T00:49:21+5:30
तळोधी (बा) अप्पर तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या धानपिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, बेरड, करपा, लाल्या, गाद व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे ....
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (बा) : तळोधी (बा) अप्पर तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या धानपिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, बेरड, करपा, लाल्या, गाद व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे ह्या परिसरातील शेतकºयामध्ये कृषी विभागाने धान पिकांचे सर्वेक्षण करून रोगांना विषयी माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे व त्यांच्यामध्ये प्रशासना विरोधात असंतोष उफाळला असून नुकसानग्रस्त शेतकºयांच्या धानपिकांचे सर्वेक्षण करून नुकसान मागणी जोर धरत आहे.
तळोधी (बा) हे पूर्व विदर्भातील धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असून या ठिकाणी चिमूर, नागभीड, सिंदेवाही, मेंडकी व परिसरातील अनेक गावातून धान्य विक्रीसाठी आयात केले जाते. मात्र ह्यावर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील शेतकºयांनी विविध मार्गाने धान रोवणीसाठी कर्ज घेवून रोहणी केलेले होते. मात्र ऐनवेळी हातात येणारे धान पिकावर महागड्या औषधीची फवारणी करून सुद्धा त्यांचा काहीच परिणाम होत नसून पुर्णपणे धानपिक नष्ट होत आहे. मात्र शासन शेतकºयांना दिलासा म्हणून कर्जमाफी देवू असा प्रकारचे खोटे आश्वासन देत असून अजूनपर्यंत शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचा एक रुपया सुद्धा जमा झालेला नाही. अशा प्रकारे दुहेरी संकटात शेतकरी आहे.
रामपूर : सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली या भागात वेकोलीच्या कोळसा खाणी आहे. मात्र वेकोली बल्लारपूर क्षेत्रामार्फत पर्यावरणाचा कुठलाही विचार केला जात असून असंख्य प्रमाणात बांभुळीचे झाडे या भागात पसरले असून जंगली डुकरांचे वास्तव्य वाढले रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात डुकरांचा कळप शेतीत घुसून शेतीला पिकांचे अतोनात नुकसान करीत असून सदर भागातील हजारो शेतकरी आर्थिक संकटात येत आहे. या अगोदर वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कृषी विभाग, वन विभाग यांनी केवळ पंचनामा करुन अडीचशे ती तीनशे रुपये हेक्टरीच नुकसान भेटले. असे सांगण्यात येत असून वेकोली प्रशासन निगरगट्ट झाले आहे. ते सुद्धा ऐकून घेत नाही आहे. अर्ध्याअधिक शेती ही वेकोलीच्या प्रदूषणाच्या विखाड्यात भेटली असून अर्ध्या शेतीच्या उत्पादनावर डुकरांनी हात साफ केला आहे. येथील शेतकºयांवर उपासमारीची वेळ येत आहे. १ मे रोजी सास्ती ग्रामपंचायतीत सहा टक्के नुसार ठराव घेऊन शेतकºयांचा विचार करीत नसेल तर कोळसा खाणी बंद करण्याचा ठरव घेण्यात आला होता. त्याचबरोबर कोलगाव ग्रामपंचायतीने आठ एक नुसार ठराव घेऊन खाण बंद करण्यात ग्रामसभेचा ठराव घेतला होता. मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास शासनाने नकार दिला आहे. करिता सदर भागातील शेतकºयांवर उपासमारीची वेळ आहे.
मी तीन एकरात धान लावला. यावर माझे पन्नास हजार रुपये खर्च झाले. आता धानाची फसल अंतिम टप्प्यात आलेली असताना या धानावर विविध रोगांनी आक्रमण केलेले आहे. यामुळे माझे संपुर्ण फसल नष्ट झालेली आहे. आता मी धानपिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडू याची चिंता लागली आहे.
- संजय तलमले,
शेतकरी, तळोधी (बा)