तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:38+5:302021-08-01T04:25:38+5:30
कधी पाऊस, कधी ऊन, कधी थंडी, कधी गर्मी अशा वातावरणामुळे सर्दी, खोकला व व्हायरल तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...
कधी पाऊस, कधी ऊन, कधी थंडी, कधी गर्मी अशा वातावरणामुळे सर्दी, खोकला व व्हायरल तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या रुग्णांत लहान मुलांची संख्या अधिक असल्याचे खासगी व शासकीय रुग्णालयातील आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्याचा धोका लहान मुलांना अधिक असल्याने लहान मुलांना कोरोनासारखी लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करुन कोरोनाची चाचणी करावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
बॉक्स
ताप आला म्हणजे कोरोना असे नाही
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे अनेक रुग्णांत आढळून येतात. हिच कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यामुळे आपणालासुद्धा कोरोना झाला असे न समझता डॉक्टरांकडून निदान करावे.
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामध्ये लहान मुलेसुद्धा आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
सर्दी, खोकला, तापाची साथ
पावसाळ्यात साधारणत: सर्दी, खोकला तसेच व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येतात. सध्यस्थितीत जिल्ह्यातील २५ ते ३० टक्के रुग्ण सर्दी, खोकल्याचे आढळून येत आहेत. तर चार ते पाच टक्के रुग्ण डेंग्यू, मलेरियाचे आढळून येत आहेत.
-------
बॉक्स
बालकांसाठी कोविड केअर सेंटर
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला टाळण्यासाठी प्रशासनातर्फे तयारी करण्यात येत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना असल्यामुळे प्रत्येक तालुका ठिकाणी सुसज्ज असे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. यामध्ये आयसीयू व ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.