बोंडअळीच्या नियंत्रणासाठी ‘क्रॉपसॅप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:15 PM2018-08-13T23:15:34+5:302018-08-13T23:15:51+5:30
जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंळअळीचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली. कोरपना राजुरा व जिवती तालुक्यात काही गावांमध्ये बोंडअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील कापूस पिकावर बोंळअळीचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसू लागली. कोरपना राजुरा व जिवती तालुक्यात काही गावांमध्ये बोंडअळीने नुकसानीची पातळी ओलांडली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना जिल्हास्तरीय समिती गठित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या समितीमार्फत क्रॉपसॅप योजनेला गती देवून कापूस पिकावरील बोंडअळीचे नियंत्रण केले जाणार आहे. ही समिती दर दोन आठवड्यात आढावा घेणार आहेत.
मागील वर्षी बोंडअळीने हजारो हेक्टरवरील कापूस पीक नष्ट केले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका बसला. शेकडो शेतकºयांना लागवडीचा खर्चही मिळाला नाही. बºयाच शेतकºयांनी कर्ज काढून शेती केली होती.
परंतु, पीक हाती न आल्याने कर्ज कसे भरावे, हा प्रश्न त्याच्यापुढे निर्माण झाला होता. सोयाबीन पिकाचेही प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. बहुतांश शेतकºयांनी बीटी बियाण्यांची लागवड केली. या वाणांच्या प्रसारानंतर सुरूवातीच्या काही वर्षात चांगले उत्पादन झाले होते.
मात्र बीटी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाच्या हंगामातही हीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने समिती गठित करण्याचा निर्णय घेतला.
ही समिती जिल्ह्यातील तालुकानिहाय दौरे करून कापसाची सद्यस्थिती जाणून घेणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालक तसेच राज्याच्या कृषी आयुक्तांना सादर करणार आहेत.
समितीमध्ये बारा जणांचा समावेश
बोंडअळीच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये १२ अधिकाºयांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कुणाल खेमणार हे अध्यक्ष असून यामध्ये सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील जबाबदारी सांभाळतील. समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून जिल्हा उपनिबंधक, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक, कृषी विद्यापीठाचे जिल्हा प्रतिनिधी, केंद्रीय कृषी संशोधन संस्थेचे तज्ज्ञ, जिल्हा कृषी विकास अधिकारी, महाराष्ट कृषी उद्योग महामंडळाचे प्रतिनिधी, जिनींग मिल्सचे प्रमुख, बियाणे उत्पादक विक्री संघटनेचा व किटकनाशक उत्पादक विक्री संघटनेचा प्रतिनिधी सहभागी आहेत.
समितीची कार्यपद्धती
ही समिती कापूस उत्पादक तालुक्याचा परिस्थितीनुसार दर १५ दिवसांत आढावा घेणार आहे. यामध्ये पीक परिस्थिती क्रॉपसॅप योजना, कीडरोग प्रादुर्भावाची सद्यस्थितीवर उपाययोजना आणि स्थानिक शेतकºयांच्या सहकार्याने जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकºयांची संपूर्र्ण माहिती संकलीत करून लगेच उपाययोजना करणार आहेत.