एक कोटी ४० लाखांचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:08 PM2018-06-22T23:08:22+5:302018-06-22T23:09:06+5:30

Crore loan allocation of 1.44 million | एक कोटी ४० लाखांचे पीक कर्ज वाटप

एक कोटी ४० लाखांचे पीक कर्ज वाटप

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांंना दिलासा : स्टेट बँकेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर : गडचांदूर शहरातील एकमेव राष्ट्रीयकृत भारतीय स्टेट बँकेने यावर्षी आजपर्यंत १३० शेतकºयांना एक करोड ४० लाख रुपयांचे खरीप हंगामी पीक कर्ज वाटप केल्याची माहिती शाखा व्यवस्थापक अनंत टेकाम यांनी लोकमतला दिली.
क्षेत्र अधिकारी सोनवने यांचे स्थानांतरण झाल्यावर कुणीही अधिकारी नसतानासुद्धा शाखा व्यवस्थापक अनंत टेकाम, प्रशांत पाटील, कृषी सहयोगी सचिन कांबळे यांनी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न करुन १३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले. या हंगामात ३० जूनपर्यंत २५० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येईल, असे सचिन कांबळे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ २० शेतकºयांना दिले आहे.
१०० शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. स्टेट बँक शाखा गडचांदूरच्या वतीने गडचांदूर व वडगाव येथे शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना बँकेच्या विविध कृषी विषयक योजनांची माहिती दिली.
स्टेट बँकेने वडगाव, खिर्डी, अंतरगाव, पिपर्डा, सोनुर्ली, बिबी, इंजापूर, भुरकुंडा, उपरवाही, हरदोना, पिंपळगाव तथा इतर गावातील शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Crore loan allocation of 1.44 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.