सापाच्या तावडीतून पिल्लाला वाचविताना कावळ्याचाच गेला जीव,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:36+5:302021-09-09T04:34:36+5:30
नवरगाव : गावालगतच्या शेतामध्ये झाडावर असलेल्या कावळ्याच्या घरट्यातील पिलांमध्ये अचानक साप शिरला. मोठ्या कावळ्यांनी पिलांचा जीव वाचविण्यासाठी ...
नवरगाव : गावालगतच्या शेतामध्ये झाडावर असलेल्या कावळ्याच्या घरट्यातील पिलांमध्ये अचानक साप शिरला. मोठ्या कावळ्यांनी पिलांचा जीव वाचविण्यासाठी सापावर हल्ला केला. मात्र यामध्ये एका कावळ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०.३०च्या सुमारास घडली.
जगदीश गहाणे यांचे गावालगत शेत असून त्यामध्ये सागाचे झाड आहे. या झाडावर ५० फूट उंचावर कावळ्याचे घरटे आहे. त्यामध्ये कावळ्याचे पिल्ले असल्याने त्यांना खाण्यासाठी धामण जातीचा मोठा साप पन्नास फूट उंच सागाच्या झाडावर चढला. त्यामुळे कावळे पिलांना वाचविण्यासाठी ओरडायला लागले. कावळ्यांनी पिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र सापाने एका मोठ्या कावळ्याचाच जीव घेतला. हे झाड रस्त्यालगत असल्याने नागरिकांनीही त्याकडे धाव घेतली. नागरिकांच्या ओरडण्याने साप शेतात पळून गेला.
080921\1515-img-20210908-wa0001.jpg
याच सागाच्या झाडावर चढला साप